first bjp and then lokmangal says subhash deshmukh | Sarkarnama

अगोदर भाजप; मग लोकमंगल - सुभाष देशमुख 

संतोष सिरसट
रविवार, 15 मार्च 2020

माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी `भाजप, की लोकमंगल' या प्रश्नावर `आधी भाजप आणि मग लोकमंगल' असे उत्तर सोलापुरातील एका मुलाखतीत दिले. 

सोलापूर - माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी `भाजप, की लोकमंगल' या प्रश्नावर `आधी भाजप आणि मग लोकमंगल' असे उत्तर सोलापुरातील एका मुलाखतीत दिले. 

"महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दक्षिण सोलापूर शाखेच्यावतीने "सोलापूर रंगे, नेत्यांच्या संगे' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

या वेळी देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी योग्य व्यक्तिमत्त्व आहेत असेही सांगितले. केंद्रात नितीन गडकरी तर राज्यात देवेंद्र फडणवीस योग्य असल्याचे सांगण्यासही आमदार देशमुख विसरले नाही. शहरातील दोन देशमुख एकत्र का येत नाहीत असा प्रश्‍न देशमुख यांना विचारला असता आम्ही एकच आहोत, असे त्यांनी सांगितले. 

चित्रा वाघ यांचा आंदोलनाचा इशारा कामी आला
 

"सोलापूर रंगे, नेत्यांच्या संगे' या कार्यक्रमात माजीमंत्री शिंदे व देशमुख यांची मुलाखत ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी यांनी घेतली. सुशीलकुमार शिंदे यांना राहुल गांधी की प्रियांका गांधी यांच्यापैकी कोण आवडते असा प्रश्‍न मुलाखातकारांनी केला. त्यावेळी हा प्रश्‍न अवघड असल्याचे सांगत त्यांनी उत्तर देणे टाळले. या प्रश्‍नाने ते गडबडून गेले. त्याचवेळी माजीमंत्री सुभाष देशमुख यांनी शिंदे यांच्याकडून हसणे घेण्याची इच्छा व्यक्त केली. 

31 मार्चपर्यंतच्या MPSC परीक्षा रद्द - आदित्य ठाकरे

शिंदे व देशमुख हे दोघेही राजकारणात आले नसते तर त्यांना काय व्हायला आवडले असते या प्रश्‍नाने मुलाखतीची सुरवात झाली. शिंदे यांनी वॉचमन, चपराशी किंवा पिढीजात धंदा केला असता असे उत्तर दिले. त्याचवेळी शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीच आपल्याला राजकारणात आणल्याचे आवर्जून सांगितले. त्याचवेळी नोकरीचा राजीनामा देऊन निवडणुकीला उभा राहण्याचा निर्णय घेतला. पण, तिकीट कापले गेले. त्यावेळी नोकरीही गेली अन तिकीटही गेल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यावेळी वेगवेगळ्या लोकांना घेऊन सरकार चालविले होते. त्याचप्रमाणे आताचे तीन पक्षाचे सरकारही चालेल असा विश्‍वास शिंदे यांनी व्यक्त केला. 

कोरोना इफेक्ट : परिक्षांबाबत निर्णय होत नाही तोपर्यत विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहता येणार - पुणे जिल्हाधिकारी 

राजकारणात नेत्यांची मैत्री असते पण कार्यकर्ते एकमेकांचे वैरी असतात त्याबाबत काय सांगाल असे विचारले असता शिंदे म्हणाले, सगळ्याच पक्षामध्ये मित्र आहेत. माजी पंतप्रधान (कै.) अटलबिहारी वाजपेयी हे कर्तृत्ववान होते. याविषयी देशमुख म्हणाले, गाव पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये ईर्षा असते. पण, त्यांनी ती ईर्षा न बाळगता आमदार, खासदार ज्याप्रमाणे वागतात त्याचप्रमाणे गावतही वागायला हवे. त्यासाठी त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. 

डॉ. भागवत कराडांना पेढा भरवत अंबादास दानवेंकडून चंद्रकांत खैरेंच्या जखमेवर मीठ

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्यावेळी शिंदे यांनी त्यांच्याबाबत घडलेली गोष्ट सांगितली. पण, सावरकर हे समाजक्रांतीकारक होते असेही त्यांनी स्पष्ट केले. श्री. देशमुख यांनी शिंदे सोलापुरात येत नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केल्याचा मुद्दा मांडला. त्यावेळी त्यांनाही थेट त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडून विचारणा झाल्याचे सांगितले. शिंदे-देशमुख हे एवढे पॉवरफुल्ल आहेत पण तुम्हाला चिमणी कशी भारी पडली? असा प्रश्‍न विचारताच होटगी रोड विमानतळ व बोरामणी विमानतळाबाबत चर्चा झाली. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्या रागाबाबतही प्रश्‍न विचारला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख