माकप कार्यालयाच्या आगीत वनजमिनींच्या दाव्याच्या शेकडो फाईल नष्ट

शनिवारी मध्यरात्री मार्क्‍सवादी कम्युनीस्ट पक्षाच्या कार्यालयाला आग लागली. बाजारपेठेत मध्यवस्तीतच कार्यालय आहे. येथे झेरॉक्‍सचे दुकान चालविले जाते. आग लागल्याने सर्व झेरॉक्‍स यंत्रे, पत्रव्यवहाराच्या फाईल्स आणि विशेषतः राज्यभर माकपतर्फे सुरु असलेल्या आदिवासी वनजमीन आंदोलनाशी निगडीत पत्रव्यवहार व वनजमीन दाव्याच्या शेकडो फाईल्स नष्ट झाल्या. आज सकाळी हा प्रकार कळताच पोलिसांसह विविध यंत्रणा सक्रीय झाल्या.
माकप कार्यालयाच्या आगीत वनजमिनींच्या दाव्याच्या शेकडो फाईल नष्ट

सुरगाणा : काल मध्यरात्री येथील मध्यवस्तीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाला आग लागली. यामध्ये आदिवासींच्या वनदाव्यांच्या शेकडो फाईल्ससह संपूर्ण कार्यालय नष्ट झाले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय विरोधकांनी अवैध व्यवसायिकांना हाताशी धरुन हे षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. येत्या तीन दिवसांत पोलिसांनी आरोपींना अटक न केल्यास आरोपींना आमचे कार्यकर्ते स्वतः पकडून देतील असा इशारा माकपचे ज्येष्ठ नेते आमदार जे. पी. गावीत यांनी दिला आहे.

शनिवारी मध्यरात्री मार्क्‍सवादी कम्युनीस्ट पक्षाच्या कार्यालयाला आग लागली. बाजारपेठेत मध्यवस्तीतच कार्यालय आहे. येथे झेरॉक्‍सचे दुकान चालविले जाते. आग लागल्याने सर्व झेरॉक्‍स यंत्रे, पत्रव्यवहाराच्या फाईल्स आणि विशेषतः राज्यभर माकपतर्फे सुरु असलेल्या आदिवासी वनजमीन आंदोलनाशी निगडीत पत्रव्यवहार व वनजमीन दाव्याच्या शेकडो फाईल्स नष्ट झाल्या. आज सकाळी हा प्रकार कळताच पोलिसांसह विविध यंत्रणा सक्रीय झाल्या. येथील पोलिस निरीक्षक पी. टी. वाघमारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन त्याच्या पंचनाम्याच्या सुचना केल्या. माकपच्या अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी येथे गर्दी केल्याने काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष व माकपचे आमदार जे. पी. गावीत यांनी येथे भेट दिली.

माकपतर्फे अवैध व्यवसायांविरोधात आंदोलन व मोहिम सुरु आहे. हे व्यवसायिक पोलिसांच्या आर्शिवादानेच काम करतात. माकप विरोधातील राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण बिघडवण्यासाठी अवैध व्यवसाय करणाऱ्यांमार्फत हे आगीचे षडयंत्र रचले आहे. ते लवकरच उघडकीस आणू आमदार जे. पी. गावीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com