ऊसतोड मजूरांच्या मदतीला धाऊन गेलेल्या सुरेश धसांवर गुन्हा

पोलिसांकडून मारहाण झाल्याचा फोन आल्यानंतर मध्यरात्रीच पोचून सुरेश धस यांनी दुसऱ्या दिवशी दुपार पर्यंत ठिय्या मांडला होता. त्यांच्यावर जमावबंदी, संचारबंदीतील विविध कलमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरुन आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
FIR launched against MLC suresh dhas in aashti police station
FIR launched against MLC suresh dhas in aashti police station

बीड : मध्यरात्री ऊसतोड मजूरांच्या मदतीला धाऊन जाणाऱ्या आणि त्यांच्यासाठी मध्यरात्रीपासून दुसऱ्या दिवशीपर्यंत ठिय्या मांडणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. संचारबंदी व जमावबंदीतील कलम १८८ नुसार त्यांच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

आष्टीसह पाटोदा, गेवराई आदी भागातील ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात गेलेले मजूर परतत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व सिमा सिल केलेल्या आहेत. यामुळे या मजूरांना भिगवण - खेड (ता.कर्जत) येथे पोलिसांनी मारहाण केल्याची कैफीयत मजूरांनी रात्री सव्वा एक वाजता फोनवरुन सुरेश धसांच्या कानी घातली. धसांनीही थेट मध्यरात्रीच घटनास्थळ गाठले आणि पोलिसांवरील कारवाईच्या मागणीसाठी मजूरांसोबत ठिय्या मांडला. गुरुवारी दुपारपर्यंत ते मंजूरांसोबतच बसून होते. मात्र, सध्या संचारबंदी, जमावबंदी व लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सिमाही सिल आहेत. मात्र, त्यांनी कलम १८८ चे उल्लंघन करुन जिल्ह्याची हद्द ओलांडल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर हा गुन्हा नोंद करण्यात आला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com