चंद्रकांतदादांकडे दाद मागायला गेलेल्या विद्यार्थ्यांवर सहा महिन्यांनी गुन्हे - fir against students after six months | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांतदादांकडे दाद मागायला गेलेल्या विद्यार्थ्यांवर सहा महिन्यांनी गुन्हे

संपत मोरे
बुधवार, 29 जानेवारी 2020

पुणे : तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मुंबईतील घरी सप्टेंबर 2019 मध्ये दाद मागायला गेलेल्या विद्यार्थ्यांना गुन्हे दाखल केल्याचा नोटिसा पोलिसांनी पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

राज्यसेवा परीक्षेत उत्तीर्ण असूनही डावलले गेल्याने राज्यातील काही विद्यार्थी तेव्हाचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे न्याय मागायला गेले. तेव्हा काही विद्यार्थी ओक्साबोकशी रडत होते.

याबाबत विद्यार्थ्यांनी दिलेली माहिती अशी की सहायक मोटर वाहन निरीक्षक या पदावर त्यांची निवड झाली होती. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्याना बाहेर काढण्यात आले. त्यांना बाहेर काढल्याचे समजताच मुंबईत असलेले तरुण तरुणी दाद मागायला चंद्रकांत पाटील यांच्या घरी गेली. काही मुलं बोलताना रडत होती,या घटनेचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले होते.

संबंधित लेख