नगरसेविकेच्या नातेवाईकाला धडा शिकवण्यासाठी नगरमधील फवारणीचे काम बंद!

काल रात्री नागापूर परिसरात महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी फवारणी करीत असताना नगरसेविकेच्या नातेवाईकांकडून दोन कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली.
fir against nilesh bhakare register in tofkhana police station
fir against nilesh bhakare register in tofkhana police station

नगर : काल रात्री नागापूर परिसरात महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी फवारणी करीत असताना नगरसेविकेच्या नातेवाईकांकडून दोन कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे आज स्वच्छता कर्मचाऱ्यांनी फवारणीचे काम बंद केले आहे. 

याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात निलेश भाकरे व इतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात गेल्या काही दिवसांपासून फवारणी सुरू आहे. प्रत्येक प्रभागात स्वच्छता कर्मचारी जावून तेथे फवारणी करीत आहेत. उपनगर परिसरातही फवारणी सुरू आहे. बुधवारी रात्री नागापूर गावठाण परिसरात औषध फवारणीचे काम सुरू होते. काल रात्री असे फवारणीचे काम नागापूर परिसरात सुरू असताना निलेश भाकरे व त्याच्या सात-आठ सहकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. आम्ही सांगू तेथेच फवारणी करण्याचा त्यांनी आग्रह धरला, असे त्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. स्वच्छता निरीक्षक सुरेश वाघ व अविनाश हंस यांनी भाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तथापी, त्यांनी या दोघांनालाकडी दांडके व दगडाने मारहाण केली.यामध्ये दोघांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. या प्रकरणी सुरेश वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलेश भाकरे व इतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  

कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
स्वच्छता कर्मचारी रात्रभर जागून फवारणीचे काम करीत आहेत. काही लोकांकडून मात्र त्यांना धमकावण्याचे प्रकार होत आहे. मुकुंदनगर भागात आशा कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्यात आली होती. आता स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही नागापूर परिसरात मारहाण झाल्याने कर्मचारी संघटनांनी आज फवारणीचे काम बंद आंदोलन पुकारले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com