आमदार शिरसाट यांच्यासह शिवसेनेच्या उपमहापौराविरुद्ध गुन्हा दाखल

...
sanjay shirsath
sanjay shirsath

औरंगाबाद : ठेकेदारीच्या वादावरून रविवारी शिवसेनेच्या शहर संघटक सुशील खेडकर यांना आपल्या संपर्क कार्यालयात मारहाण केल्या प्रकरणी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ व उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पालकमंत्री सुभाष देसाई हे औरंगाबादेत आपली पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक घेत असतानाच हे प्रकरण समोर आल्याने संजय शिरसाठ अडचणीत आले आहे.

सातारा देवळाई परिसरातील दोन कोटींच्या रस्त्याचे कंत्राट मिळावे यासाठी सुशील खेडकर यांनी निविदा भरली होती . ही निविदा मागे घेण्यासाठी संजय शिरसाट यांनी खेडकर यास आपल्या संपर्क कार्यालयात बोलावले होते. यावेळी झालेल्या वादावादीतून संजय शिरसाठ , राजेंद्र जंजाळ व त्यांच्या समर्थकांनी खेडकर व त्याच्या अन्य तीन साथीदारांवर जोरदार हल्ला चढवला होता .

या प्रकरणाने औरंगाबाद शिवसेनेत खळबळ उडाली होती. आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांना अशाप्रकारे मारहाण करणे योग्य नसल्याचा सूर स्थानिक नेत्यांमधून उमटला होता.  सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी शहरात आले होते. त्यामुळे खेडकर मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये यासाठी संजय शिरसाठ व स्थानिक नेत्यांनी आटोकाट प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. 

परिणामी रात्री उशिरा शिरसाठ व जंजाळ यांच्याविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विकासकामे रखडल्यामुळे लोक तक्रारी करत होते, म्हणून समज देण्यासाठी खेडकर यास बोलावले होते ,पण त्यानेच अरेरावी केल्यामुळे समर्थकांनी त्याला मारहाण केल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला होता. तर खेडकर यांनी मात्र टेंडर मागे घेण्यासाठीच संजय शिरसाट यांनी ठरवून मला मारहाण केली असा आरोप आपल्या जबाबात केला आहे

शिवसेनेवर कंत्राटदाराच्या आरोप करणाऱ्या भाजपकडून आगामी महापालिका निवडणुकीत या प्रकरणाचे भांडवल केले जाण्याची शक्यता आहे. औरंगाबाद येथील महाएक्सपो प्रदर्शनात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देखील लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदार यांच्यातील संबंधावरून मोठे विधान केले होते. हे विधान करून आठवडा उलटत नाही तोच शिवसेनेत ठेकेदारी वरून मारहाणीचा प्रकार घडला. यावरून आता राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com