कैलास विजयवर्गीयांसह 350 जणांविरुद्ध गुन्हा

..
kailas_vijayvargiy
kailas_vijayvargiy

इंदूर : भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्यासह 350 कार्यकर्त्यांविरुद्ध जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी इंदूर शहरात गुन्हा दाखल झाला आहे.

इंदूरमध्ये एका आंदोलनादरम्यान भाजप नेत्यासह अन्य मंडळी एका अधिकाऱ्यास धमकावत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये कैलास विजयवर्गीय हे आमच्या संघाचे नेते शहरात आहेत; अन्यथा आज आग लावली असती, असे म्हणताना दिसतात. भाजप नेत्याचा हा व्हिडिओ सर्वत्र पसरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

संघ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी सरसंघचालक मोहन भागवत आणि संघाचे अन्य ज्येष्ठ नेते इंदूरमध्ये गुरुवारपासून आहेत. या पार्श्‍वभूमीवर मध्य प्रदेश पोलिस भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे भाजपने स्थानिक अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शुक्रवारी आंदोलन केले होते.

कैलास विजयवर्गीय आणि कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्त आकाश त्रिपाठी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले आणि त्यांना भेटण्याची वेळ मागितली. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. या वेळी विजयवर्गीय यांनी म्हटले की, अधिकारी शहरात आहेत की बाहेर, हे सांगण्याचे सौजन्य नाही का? आम्ही हे सहन करणार नाही. आमचे संघाचे नेते शहरात आहेत; अन्यथा इंदूरमध्ये आग लावली असती. हे वक्तव्य व्हिडिओत बंदिस्त झाले असून, ते व्हायरल झाले आहे. तहसीलदाराने दिलेल्या तक्रारीवरून कैलास विजयवर्गीय आणि खासदार शंकर लालवानी यांच्यासह 350 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती संयोगिता गंज पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्रसिंह रघुवंशी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com