उदय वाघांवर माराहाणीचा तर, मार खाल्लेल्या माजी आमदार पाटलांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा

उदय वाघांवर माराहाणीचा तर, मार खाल्लेल्या माजी आमदार पाटलांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा

अमळनेर : भारतीय जनता पक्षाच्या अमळनेर येथे झालेल्या सभेत व्यासपीठावर झालेल्या माराहाणीवरून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. माजी आमदार बी. एस. पाटील यांनी मारहाणीची तक्रार दाखल केली. त्यांच्याविरोधी गटाने पाटील यांच्यावर अॅट्रोसिटीची तक्रार दिली आहे. 

माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी मारहाण झाल्याप्रकरणी उदय वाघ व त्यांच्या समर्थकांविरुद्ध अमळनेर येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. या माराहाणीचा प्रकार राज्यात गाजला. या वेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांना हस्तक्षेप करावा लागला. ऐन निवडणुकीत हा प्रकार घडल्याने ही हाणामारी भाजपसाठी अडचणीची ठरली आहे.

डॉ. पाटील यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह शहराध्यक्ष शीतल देशमुख, राजेश वाघ, पंकज पवार यांची नावे फिर्यादीत दिली आहेत. त्यातील काहींना पोलिसांनी अटक केली. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.  

``मेळावा सुरू होत असताना आम्ही व्यासपीठाच्या पुढील रांगेत बसलो होतो. उदय वाघ व त्यांच्या काही समर्थकांनी व्यासपीठासमोर गोंधळ घातला. यावेळी माझ्याशेजारी बसलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी धमकावत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी माझ्या नाकातोंडातून रक्‍त आल्याने मी खाली कोसळलो. मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील व पोलिसांनी मला त्यांच्या तावडीतून सोडवत व्यासपीठाच्या मागील खुर्चीवर बसविले. उदय वाघ यांच्या पत्नी स्मिता यांची जळगाव लोकसभेची उमेदवारी रद्द झाल्याचा राग मनात ठेवून त्यांनी तसेच भाजपचे शहराध्यक्ष शीतल देशमुख, राजेश वाघ, पंकज पवार, देवा लांडगे, एजाज बागवान, संदीप वाघ यांनी मला धमकावत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली,``असे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.

पंचायत समिती सभापतींची पाटलांविरुद्ध तक्रार 

दरम्यान, या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात पंचायत समितीच्या सभापती वजाबाई भिल यांनी फिर्याद दिली असून, त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की मेळाव्यापूर्वी व्यासपीठाच्या बाजूला रेखाबाई पाटील, शोभाबाई खैरनार व गुलाब खाटीक यांच्यासह मी उभी असताना माझ्याजवळ माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील आले. त्यावेळी डॉ. पाटील यांनी जातिवाचक बोलून ठार मारण्याची धमकीही दिली. त्यांनी मला वीस दिवसांपूर्वी दवाखान्यात बोलाविले होते. याचा मनात राग धरून मी भिल समाजाची महिला असूनही जातिवाचक शिवीगाळ करून मारण्याची धमकीही दिली होती. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी रात्री उशिरा पोलिस ठाण्यास भेट देऊन घटनेची माहिती घेतली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com