fir against bankhele for using abusive language for walase patil | Sarkarnama

वळसे पाटलांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याने बाणखेलेंविरुद्ध गुन्हा

चंद्रकांत घोडेकर
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

घोडेगाव : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे झालेल्या महायुक्तीच्या सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या विरुद्ध वैयक्तिक शिवीगाळ व मानहानी करून अर्वाच्य भाषेत वक्तव्ये केल्याप्रकरणी महायुतीचे उमेदवार राजाराम भिवसेन बाणखेले यांच्यावर घोडेगाव पोलिस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

राजाराम बाणखेले यांनी घोडेगाव येथे महाराणी लक्ष्मीबाई चौकात शुक्रवारी (ता. 4) झालेल्या सभेत हे वक्तव्य केले. याबाबत एफएसटी या फिरते पथकाचे प्रमुख संदीप सुदाम म्हसळे यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यावेळी पथकाने केलेल्या चित्रीकरणाची पडताळणी करून बुधवारी (ता. 9) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदिप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार डी. एच. वाघोले करीत आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख