जोतिबा यात्रेला निघालेल्या पाडळीतील 40 जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी आता कडक भूमिका घेतल्याने सर्व धार्मिककार्यक्रम बंद पडले आहेत.
police
police

सातारा : प्रशासनाचा आदेश डावलून वाडी रत्नागिरी (जि. कोल्हापूर) येथील जोतिबा यात्रेसाठी निघालेल्या पाडळी(ता.सातारा) येथील पाच ग्रामस्थांसह अज्ञात ३० ते ४० ग्रामस्थांवर बोरगाव पोलीस ठाण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह अन्य कलमानव्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा हे गुन्हे दाखल झाले. आहेत. अशोक जगन्नाथ ढाणे (वय.५०), संतोष महादेव ढाणे (वय. ४०),कालिदास सदाशिव गुरव (वय.६०), बाळासो दत्तात्रेय गुरव (वय ६०), भूषण भीमराव ढाणे (वय ३०) अशी गुन्हे दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत बोरगाव पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, राज्यातकोरोना विषाणू रोगप्रसार रोखण्यासाठी  जिल्हाधिकाऱ्यानी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात जमावबंदी, संचारबंदी लागू केली असून सार्वजनिक
कार्यक्रम व गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्हयातील सर्व यात्रा व जत्रा ही रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातीलही सर्व यात्रा रद्द केल्या असून त्यामध्ये वाडीरत्नागिरी येथील जोतिबा यात्रेचाही समावेश आहे.

तरीही पाडळी (ता .सातारा) येथील काही ग्रामस्थ वाडी रत्नागिरी येथील जोतिबा यात्रेस जाण्यासाठी चौकात एकत्र जमले असल्याची
माहिती सपोनि चंद्रकांत माळी यांना समजल्यावर त्यांनी हवालदार विशाल जाधव, राजू शिखरे, स्वप्नील माने व चालक धनंजय जाधव यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी गावातील मुख्य चौकात ग्रामस्थ बैलगाड्या सजवून मोठ्या संख्येने जमाव जमवून यात्रेस निघण्याच्या तयारीत होते. पोलिसांना पाहताच काही ग्रामस्थांनी तेथून पलायन केले. या वेळी पोलिसांनी अशोक ढाणे, संतोष ढाणे, कालिदास गुरव,बाळासो गुरव व भूषण ढाणे यांच्यासह ३० ते ४० ग्रामस्थांवर  कलम १८८,२६९,मुंबई पोलीस अधिनियम १३५ व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ (ब) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास हवालदार रामचंद्र फरांदे करत आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com