fir against 2500 maratha activist | Sarkarnama

'मराठा क्रांती'च्या 2500 कार्यकर्त्यांवर साताऱ्यात दंगलीचे गुन्हे 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

सातारा : मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलनानंतर महामार्गावर रास्ता रोको, जाळपोळ, तोडफोड केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अडीच हजार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दंगल घडविणे, खूनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेची नुकसानी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील केवळ दहा जणांना अटक झाली आहे. 

सातारा : मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलनानंतर महामार्गावर रास्ता रोको, जाळपोळ, तोडफोड केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अडीच हजार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दंगल घडविणे, खूनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेची नुकसानी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील केवळ दहा जणांना अटक झाली आहे. 

आरक्षण मागणीसाठी बुधवारी मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलन झाले. दुपारनंतर आंदोलनात सहभागी काही युवकांनी महामार्ग रोखण्यासाठी बाम्बे रेस्टॉरंट चौकात गेला. तेथे पुलावर महामार्ग रोखण्यावरून हिंसक आंदोलन सुरू झाले. आंदोलकांनी उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूने दगडफेक केली. यामध्ये पोलिस अधोक्षकांसह 32 कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दुपारीनंतर पोलिसांनी धरपकड सुरू केली. 

यामध्ये निखिलेश मस्के, सुरज निगडे, उदयजित कांबळे, सचिन माने, संभाजी गंभीर, किरण जाधव (सर्व रा.सातारा शहर परिसर) अशी अटक केलेल्यांची नावे असून, यांच्यासह अल्पवयीन युवकांचाही समावेश आहे. 

बुधवारी रात्रीपासून दंगलीत समावेश असणाऱ्यांची नावे समोर येत असून त्यामध्ये मंगेश जगताप, संजय पवार, मंगेश ढाणे, मल्लेश मुलगे, सचिन कोळपे, सचिन खोपडे, महेश माने, जीवन राउते, निकेत पाटणकर, संदीप नवघणे, सचिन कदम, समीर शेख, लक्ष्मण खरडे (सर्व रा.सातारा शहर परिसर व तालुका) यांचा समावेश आहे. गुन्ह्यात निष्पन्न झालेल्यांची नावे आणखी वाढणार असून त्यांचा शोध सुरु आहे. याप्रकरणी फौजदार नानासाहेब कदम यांनी तक्रार दिली आहे. 

बुधवारी रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी सुमारे जणांना ताब्यात घेतले होते. संबंधितांची चौकशी केली असता गुरुवारी सकाळपर्यंत 10 जणांचा दंगलीत प्रत्यक्ष सहभाग आढळला. याशिवाय पोलिसांनी केलेले, शुटींग फोटो याची खातरजमा केली असता त्यातून आणखी अनेकांची नावे समोर येत असून सुमारे अडीच हजार जणांचा यामध्ये समावेश असल्याचे पोलिसांनी तक्रारीत म्हटले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख