व्हायरल सत्य : सेल्फीमुळे होऊ शकते फिंगरप्रिंट चोरी..... - Finger Print Theft possible through Selfie | Politics Marathi News - Sarkarnama

व्हायरल सत्य : सेल्फीमुळे होऊ शकते फिंगरप्रिंट चोरी.....

साम टिव्ही ब्युरो
मंगळवार, 17 जुलै 2018

नुसत्या सेल्फीनं तरुणाईलाच नव्हे तर वयोवृद्धांनाही वेड लावलंय...पण, बोट दाखवून सेल्फी काढणं आता महागात पडू शकतं हे तुम्हाला माहित आहे का...? कारण, तुमची फिंगर प्रिंट कुणीही चोरू शकतो...आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो...हे आम्ही म्हणत नाहीये, तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये दावा करण्यात आलाय

मुंबई : सेल्फी हे तरुणाईला लागलेलं व्यसनच आहे...कुठेही, कधीही सेल्फी काढला जातो...पार्टी असो वा, लग्न...सेल्फी काढल्याशिवाय कोणताही कार्यक्रम पूर्ण होत नाही...पण, तुम्हाला माहित आहे का...? तुम्ही बोटं दाखवून काढत असलेला सेल्फी किती महागात पडू शकतो...कदाचित नसेल...पण, आज आम्ही सेल्फी काढणं किती महागात पडू शकतो हे दाखवणार आहोत...चला पाहुयात सेल्फीमागचं व्हायरल सत्य... 

प्रश्न असे आहेत...
►सेल्फीमुळं होऊ शकते फिंगरप्रिंट चोरी ?
►बोटं दाखवून सेल्फी काढणं पडू शकतं महागात ?
►काय आहे व्हायरल व्हिडीओमागचं सत्य?

तोंड वाकडं करून सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरत नाही...कुठेही फिरायला गेलो तरी सेल्फी फोटो शिवाय कुणीच घरी येत नाही...सेल्फी काढणं हे एक व्यसनच जडलंय असं म्हणायला हवं...कारण, सेल्फीच्या नादात अनेकांना जीव गमवावा लागलाय...सेल्फी काढताना काळजी घ्या असं अनेकदा सांगण्यात आलं...पण, ऐकेल तर कसलं...कुठेही, कधीही, त्याला वेळ काळ मर्यादा नसते...कुणी नवीन मोबाईल घेतला की काढा सेल्फी...कुणाची पार्टी असली की काढा सेल्फी...नुसत्या सेल्फीनं तरुणाईलाच नव्हे तर वयोवृद्धांनाही वेड लावलंय...पण, बोट दाखवून सेल्फी काढणं आता महागात पडू शकतं हे तुम्हाला माहित आहे का...? कारण, तुमची फिंगर प्रिंट कुणीही चोरू शकतो...आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो...हे आम्ही म्हणत नाहीये, तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये दावा करण्यात आलाय...व्हायरल मेसेजमध्ये काय लिहिलंय पाहा...

"सेल्फी काढताना बोटं दाखवू नका.बोटं दाखवून सेल्फी काढल्यामुळं मोठं नुकसान होतं.तुमचं फिंगरप्रिंट कुणीही चोरू शकतं".....

हा व्हिडीओ आमच्या हाती लागताच आम्हालाही धक्का बसला...अनेकजण सेल्फी काढत असतात...सेल्फी काढल्यावर लगेच व्ह़ॉट्सअप डीपी, फेसबुकवर अपलोड केला जातो...मात्र, तुम्ही बोटं दाखवून काढलेल्या सेल्फीचा गैरवापर होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय..हा विषय महत्त्वाचा असल्यानं याचं सत्य जाणून घेण्याचा आमच्या व्हायरल सत्य टीमनं प्रयत्न केला...बरीच तरुणाई सेल्फीच्या आहारी गेलीय...त्यामुळं सेल्फीचे काय दुष्परिणाम आहेत हे सांगणं गरजेचं आहे...याबद्दल तंतोतंत माहिती फॉरेन्सिक एक्सपर्ट किंवा सायबर एक्सपर्ट देऊ शकतात...त्यामुळं आमचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे हे सायबर एक्सपर्ट अर्पित दोषी यांना भेटले...त्यांना व्हायरल व्हिडीओ दाखवला...आणि खरंच बोटांचा पृष्ठभाग दाखवून सेल्फी काढल्यामुळं फिंगर प्रिंट कुणी चोरू शकतं का हे जाणून घेतलं...

चांगल्या क्वॉलिटीच्या कॅमेऱ्यातून सेल्फी काढताना बोट दाखवून फोटो काढताना काळजी घ्यावी...फोटो चांगल्या क्वॉलिटीचा असल्यामुळं हॅकर्स, किंवा फोटोंचा गैरवापर करणारे भामटे तुमची फिंगर प्रिंट चोरू शकतात हे अर्पित दोषी, सायबर एक्सपर्ट यांच्याशी बोलल्यावर स्पष्ट झालं....

त्यातून निघालं व्हायरल सत्य....
♦चांगल्या क्वॉलिटीच्या कॅमेऱ्यातून फोटो काढल्यावर फिंगर प्रिंट चोरी करणं शक्य
♦थ्रीडी प्रिंट काढून गुन्हेगार फिंगर प्रिंट चुकीच्या कामासाठी वापरू शकतात
♦बोटांवरील पॉईंटवरून फिंगर प्रिंट चोरता येते
♦तुमची ओळख कोणत्याही गुन्ह्यासाठी वापरू शकतात
♦परदेशात फिंगर प्रिंट चोरून अनेक गुन्हे केलेयत
♦सेल्फी काढताना बोटांचा पृष्ठभाग दाखवू नका

त्यामुळं आमच्या पडताळणीत बोटांचा पृष्ठभाग दाखवून सेल्फी काढल्यामुळं फिंगर प्रिंट चोरी होऊ शकते हा दावा सत्य ठरला...सेल्फी कुठेही उभं राहून काढू नका...सेल्फीमुळं अनेकांना जीव गमवावा लागलाय...फोटो काढायचा असेल तर सुरक्षित ठिकाणी उभे राहून फोटो काढा...खोल दरीचा किंवा अपघातग्रस्त ठिकाणी उभं राहून फोटो काढू नका... सेल्फी काढताना मात्र, एवढी काळजी घ्या...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख