मुळीकांच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टच्या आराखड्याला अंतिम मान्यता

पुणे-नगर रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी सर्वसामान्य नागरिकांसाठी जिकिरीची ठरली आहे. त्यातून आता मार्ग निघण्यास सुरवात झाली आहे.
jagdish-mulik-yogesh-mulik
jagdish-mulik-yogesh-mulik

पुणे : पुणे- नगर रस्त्यावरील कल्याणीनगर, खराडी, विश्रांतवाडी या तीन ठिकाणच्या उड्डाणपुल व ग्रेडसेपरेटरचा प्रकल्प आराखड्याला अंतिम मान्यता देण्यात आली असून तो अंदाज समितीकडे पाठविण्यात आला आहे. 

15 मार्च पूर्वी सर्व मान्यता घेऊन तिन्ही प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ करणार असल्याची माहिती माजी आमदार जगदीश मुळीक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, नगरसेवक योगेश मुळीक यांनी दिली.

महापालिकेचे प्रकल्प प्रमुख श्रीनिवास बोनाला यांच्या बरोबर शुक्रवारी (ता 24 ) झालेल्या बैठकीत प्रकल्प आराखड्याला अंतिम मान्यता देण्यात आली. यावेळी नगरसेवक अनिल टिंगरे, शीतल सावंत, चंद्रकांत टिंगरे उपस्थित होते. या प्रकल्पांमुळे नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

गोल्फ चौक उड्डाणपुलाचे काम याआधीच सुरू झाले आहे. योगेश मुळीक हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना नगर रस्त्यावरील सर्व उड्डाणपुलांसाठी पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात भरीव अशी निधीची तरतूद करण्यात आली होती. तसेच माजी आमदार जगदीश मुळीक यांनीही या चारही प्रकल्पांसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.  संपूर्ण पुणे नगर रस्त्यावरील वाहतुकीचे सर्वेक्षण करून यापूर्वीच प्रकल्प आराखडा तयार करण्यात आले आहेत. त्यांना अंतिम मंजुरी मिळाल्याने 15 मार्च पूर्वी या उड्डाणपुलांचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती जगदीश मुळीक यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत सन २०१८ मध्ये पुणे शहरातील २०० किलोमीटर रस्त्यांचे ‘रोड सेफ्टी ऑडिट’ करणायत आले होते. त्या सर्वेक्षणात पुणे-अहमदनगर रस्ता हा वाहतुकीसाठी सर्वांत धोकादायक असल्याची बाब समोर आल्याने 

तात्कालीन स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी २०१९-२० साठीच्या पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकासाठी तयारी करताना नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी पुणे-नगर रस्ता हे एक एकक मानून ‘नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा’ तयार करण्यात आला होता. त्यामध्ये मेट्रो मार्गांचे नियोजन, बीआरटी मार्गांचे सक्षमीकरण व पुरेशी बससंख्या, ठिकठिकाणी उड्डाण पूल व ग्रेड भुयारी मार्ग आणि रोड सेफ्टी ऑडिटमध्ये सुचविलेल्या उपाययोजना करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते.

त्यानुसार‘ गोल्फ चौक, येरवडा शास्त्रीनगर  व खराडी येथे उड्डाणपूल तसेच आवश्यकतेनुसार  ग्रेड सेपरेटर उभारणे, विश्रांतवाडी येथे केंद्र शासन व पुणे मनपाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत उड्डाण पूल व भुयारी मार्गासाठी अंदाजपत्रकात ९० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली होती. 

योगेश मुळीक म्हणाले, या सर्व प्रकल्प आराखडयाना अंतिम मान्यता मिळण्यासाठी सर्व नियोजित प्रकल्प स्थळांना अधिकार्‍यांसमवेत वारंवार भेटी देऊन वाहतूक प्रश्‍नांचा अभ्यास करून पालिकेने अंतिम मान्यता दिली आहे. अंदाजपत्रकातील निधीसाठी स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत पाठपुरावा सुरू आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com