लिंगायत समाजाच्या न्यायासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांतच हाणामारी

 लिंगायत समाजाच्या न्यायासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांतच हाणामारी

पुणे : लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांची आपसात आज हाणामारी झाली. एकमेकांना इतकी जबर मारहाण करण्यात आली की त्यात एकाच्या डोळ्याला दुखापत झाली. डोळ्याजवळ झालेल्या जखमेतून रक्त वाहत असतानाच या कार्यकर्त्यांने पत्रकार परिषद घेतली. झालेली चूक लक्षात आल्यानंतर आमच्या आपसातील भांडण असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न या पदाधिकाऱ्यांनी केला. 

लिंगायत महासंघ आणि लिंगायत समन्वय समितीच्यावतीने आज पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेच्या ठिकाणीच दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांत मारामारी झाली. यामध्ये एका कार्यकर्त्याच्या डोळ्याजवळ झालेल्या जखमेतून रक्त वाहत होते. यावर स्पष्टीकरण देताना महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार म्हणाले,"" गैरसमजातून हा प्रकार घडला असून समाजातील बांधवांचा हा अंतर्गत विषय आहे. यावर आम्ही चर्चा करुन मार्ग काढू.'' तर, समन्वय समितीचे स्वागताध्यक्ष रमेश कोरे म्हणाले,"" एकाच गावचे रहिवासी असलेल्या या दोघांची इथे भेट झाली. त्यांच्यात गैरसमजातून हा प्रकार घडला.'' 

दरम्यान, लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळून राष्ट्रीय स्तरावर "अल्पसंख्याक' दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी लिंगायत समन्वय समितीतर्फे रविवारी (ता. 15) पुण्यात महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात लिंगायत समाजाच्या 50 धर्मगुरूंसह संपूर्ण राज्यातून आणि कर्नाटक, तेलंगणामधून समाजबांधव सहभागी होणार आहेत, असे महामोर्चाचे स्वागताध्यक्ष रमेश कोरे यांनी सांगितले. हा महामोर्चा बाजीराव रस्ता येथील बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यापासून सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com