fighting between shivsena workers in bjp office | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नांदेड - भोकर मधून अशोक चव्हाण 17 हजार मतांनी आघाडीवर
भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे 779 मतांनी आघाडीवर
मुक्ताईनगर : चौथी फेरी भाजपच्या रोहिणी खडसें 929 ने पुढे
भोसरी - महेश लांडगे 4 हजार 387 मतांनी आघाडीवर
माहीम मतदार संघ शिवसेना सदा सरवणकर 5000 मतांनी आघाडी
चौथ्या फेरीअखेर बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार 25552 मताने आघाडीवर
चंद्रपूर जिल्ह्यात भाजप ला धक्का..सुधीर मुनगंटीवार वगळता भाजप चे सर्व उमेदवार पिछाडीवर...
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

भाजप कार्यालयात शिवसेनेत ठोकाठोकी; संपर्कप्रमुखाच्या पीएला मारले

उमेश शेळके
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी जंगली महाराज रस्त्यावरील भाजपच्या कार्यालयात गुरुवारी बोलाविलेल्या बैठकीत शिवसेना संपर्कप्रमुखांच्या पीएला एका पदाधिकाऱ्याने मारहाण केली. खासदार गिरीश बापट, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळा कदम यांच्यासह दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमोर हा प्रकार घडला, त्यामुळे शहरात हा चर्चेचा विषय झाला.

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी जंगली महाराज रस्त्यावरील भाजपच्या कार्यालयात गुरुवारी बोलाविलेल्या बैठकीत शिवसेना संपर्कप्रमुखांच्या पीएला एका पदाधिकाऱ्याने मारहाण केली. खासदार गिरीश बापट, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळा कदम यांच्यासह दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमोर हा प्रकार घडला, त्यामुळे शहरात हा चर्चेचा विषय झाला.

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना- भाजप युती झाली आहे. युती असली, तरी शहरात शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा आलेली नाही, त्यामुळे आधीच शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यातच तुम्हाला उमेदवारी मिळून देतो असे सांगून शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने अनेक शिवसैनिकांकडून पैसे उकळले आहेत, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहर शिवसेनेमध्ये हा वाद धुमसत होता. आजच्या बैठकीला खासदार बापट, भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ, रवी अनासपुरे यांच्यासह शिवसेनेचे कदम, शहरप्रमुख संजय मोरे, उपशहरप्रमुख किरण साळी यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.

तुम्हाला उमेदवारी देतो, असे सांगून शिवसैनिकांकडून पैसे घेतले. शिवसैनिकांकडून पैसे घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? शहर शिवसेनेचे वाटोळे झाले आहे,' अशा शब्दांत आपल्या भावना या वेळी बैठकीत व्यक्त केल्या. त्या वेळी कदम यांचे पीए अतुल राजूरकर यांनी साळी यांच्याशी अरेरावीची भाषा केली. त्यातून वाढलेला हा वाद हाणामारीपर्यंत गेला. साळी यांनी राजूरकर यांना मारहाण केली. हा सर्व प्रकार भाजपच्या नेत्यांसमोर घडला. अखेर त्यांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटविला.

शिवसेना भवनमध्ये काढली समजूत

शिवसेना भवन येथे कदम आणि शहरप्रमुख मोरे यांनी साळी यांची समजूत काढली. तसेच, राजूरकर यांना शहर संघटनेपासून दूर ठेवण्याचे आश्‍वासन दिले, तेव्हा कुठे हा वाद मिटला; परंतु हा हाणामारीचा विषय शहर भाजप आणि शिवसेनेमध्ये चर्चेचा झाला होता. या संदर्भात कदम यांच्याशी संपर्क साधला असता, ही प्रचारासाठी संयुक्त बैठक होती. त्यामध्ये असा कोणताही प्रकार घडलेला नाही, असे कदम यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख