#Fightcorona : रक्तासाठी युवक कॉंग्रेस धावली चांदा ते बांदा...दहा हजार पिशव्या रक्तसंकलन !

राज्यात निर्माण झालेला रक्‍ताचा तुटवडा बघता, युवक कॉंग्रेसकडून राज्यभरात जिल्हा व तालुका पातळीवर रक्‍तदान शिबिरे घेण्यात आली होती. गेल्या दहा दिवसांत दहा हजार रक्‍तपिशव्यांचे संकलन करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आवश्‍यकतेनुसार पुन्हा रक्‍तसंकलन केले जाईल.-सत्यजित तांबे, अध्यक्ष, युवक कॉंग्रेस महाराष्ट्र
 #Fightcorona :  रक्तासाठी युवक कॉंग्रेस धावली चांदा ते बांदा...दहा हजार पिशव्या रक्तसंकलन !

नाशिक : केंद्रातील सरकारकडून भवानीक राजकारणकरीत सातत्याने कॉंग्रेसला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला राज्यातील युवक कॉंग्रेसने गेले काही महिने सकारात्मक, कल्पक व समाजाला जोडणारे उपक्रम करुन उत्तर दिले आहे. 

सध्याच्या "कोरोना'च्या संकटाला सामोरे जाण्यासाठी त्यांनी दहा हजार पिशव्या रक्तसंकलन केले. त्यासाठी पहिल्यांदाच आदिवासी पाडा ते उच्चभ्रू मुंबई, पुणे अन्‌ चांदा ते बांदा सगळीकडे कार्यकर्ते धावले. यातून त्यांनी दहा हजार पिशव्या रक्तसंकलनाचे उद्दीष्ट साध्य केले.

लॉकडाउनमुळे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने रक्‍तदान शिबिरेही थांबली होती. परिणामी राज्यात रक्‍ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही याबाबत चिंता व्यक्‍त करत आवश्‍यक काळजी घेऊन रक्‍तदात्यांनी रुग्णालये तसेच रक्‍तपेढ्यांमध्ये जाऊन रक्‍तदान करण्याचे आवाहन केले होते. 

राज्यात निर्माण झालेल्या रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन युवक कॉंग्रेसचे राज्याध्यक्ष सत्यजित तांबे यांनी राज्यभरात रक्‍तदान शिबिरे घेण्याचा उपक्रम राबविला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक ती काळजी व सोशल डिस्टन्स ठेवत युवक कॉंग्रेसच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून दहा हजार रक्‍तपिशव्यांचे लक्ष्य साध्य करण्यात आले.

युवक कॉंग्रेसकडून टोकन पद्धतीने रक्‍तदान शिबिरे झाली. रक्‍तदानासाठी थेट घरापर्यंत रुग्णवाहिकेचीही व्यवस्था युवक कॉंग्रेसकडून स्थानिक रुग्णालये तसेच रक्‍तपेढ्यांच्या मदतीने करण्यात आली होती. संकलित रक्‍त स्थानिक रुग्णालये, तसेच रक्‍तपेढ्यांना देण्यात येणार आहे. 

टाटा मेमोरिअल, ससून हॉस्पिटल येथूनही रक्‍ताची मागणी होत असल्याने युवक कॉंग्रेकडून त्यांनाही रक्‍ताचा पुरवठा करण्यात आले. या उफक्रमाला लहान लहान आदिवासी पाड्यांवरही प्रतिसाद मिळाला. अगदी एखादाच रक्तदाता असेल तर त्याच्या घरी जाऊन रक्तसंकलन करण्यात आले. त्यासाठी युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते मनापासून राबले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असल्याने युवक कॉंग्रेसकडून रुग्णांसाठी थेट घरपोच औषध देण्याची सोय करण्यात आली होती. त्याचसोबत युवक कॉंग्रेसकडून आपला स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांकही जाहीर करण्यात आला होता. त्याद्वारे समस्यांचे निवारण करण्यात येत होते. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी, मजूर बाहेरील राज्यात अडकून पडले होते. 

त्यांना राज्यात आणण्यासाठीही युवक कॉंग्रेसकडून विशेष सवलत मिळवून त्यांना राज्यात आणण्यात आले. राजस्थानातील कोटा येथे अनेक विद्यार्थी आयआयटीच्या शिक्षणासाठी गेले होते; परंतु लॉकडाउनमुळे ते अडकून पडल्याने युवक कॉंग्रेसकडून त्यांना राज्यात आणण्यात आले होते. याचप्रमाणे गुजरातमधील मजुरांनाही राज्यात आणले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com