आपली लढाई नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आहे,सावरकरांच्या नाही : रामदास फुटाणे

 आपली लढाई नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आहे,सावरकरांच्या नाही : रामदास फुटाणे

णे-"आपली लढाई नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आहे,सावरकरांच्या विरोधात नाही. सावरकरांचा विषय उपस्थित केल्यामुळे लढाईची धार बोथट होईल."असे मत माजी आमदार वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले आहे.

'भारत माझा कधी कधी देश आहे''लाल बत्ती सफेद टोपी'यासारख्या राजकीय वात्रटिका लिहिणारे फुटाणे हे भाजपविरोधी म्हणून ओळखले जातात मात्र त्यानी राहुल गांधी यांच्या सावरकरांच्या विषयीच्या विधानाबद्दल आक्षेप घेतला आहे.

राहुल गांधी यांनी'माफी मागायला मी सावरकर नाही.'असे विधान केले होते.त्याबद्दल फुटाणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

"माफी ही सावरकर यांच्या आयुष्यातील एक घटना आहे. त्याच्यापलीकडे सावरकर यांचे मोठे आयुष्य आहे.त्यांनी दहा वर्षे तुरुंगवास भोगला आहे. देशासाठी स्वतःच आयुष्य त्यांनी दिल आहे. त्यामुळे सावरकरांनी माफी मागितली हा विषय काढणे चुकीचे ठरेल. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जे योगदान दिल आहे ते आपण नाकारू शकत नाही."असे फुटाणे म्हणाले.

"कोणताही माणूस शंभर टक्के बरोबर असत नाही.सावरकर माणूस होते.त्यांच्याही चुका झाल्या. पण सावरकर कवी होते.विज्ञानवादी होते.त्यांचा विज्ञानवादी विचार कोणालाही पटला नाही आणि पचला नाही.त्यांनी जी मते मांडली ती हिंदूत्ववादी लोकांनीही स्वीकारली नाहीत.एवढी ती जहाल होती."असे फुटाणे म्हणाले.

"आपली लढाई नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या विरोधात असताना सावरकरांचा विषय काढणे चुकीचे आहे. आपली लढाई सावरकरांच्या विरोधात नाही.."असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com