चौकाचौकात होणारी गर्दी टाळा; घराची लक्ष्मण रेषा ओलांडू नका : हजारे

जागतिक कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी काळात शासन-प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत घराची लक्ष्मण रेषा न ओलांडता सर्व नागरिकांनी घरातच राहावे. कोरोना विषाणूला हरवून आपण नक्कीच विजयी होऊ, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला आहे.
fight against corona dont cross laxman rekha says anna hajare
fight against corona dont cross laxman rekha says anna hajare

राळेगण सिद्धी : जागतिक कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी काळात शासन-प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत घराची लक्ष्मण रेषा न ओलांडता सर्व नागरिकांनी घरातच राहावे. कोरोना विषाणूला हरवून आपण नक्कीच विजयी होऊ, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला आहे.

हजारे यांनी ध्वनीचित्रफीत प्रसारित करून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना गर्दी टाळण्याचे व घरातच राहण्याचे राहण्याचे आवाहन केले आहे. शासन व प्रशासनाचे आदेश गांभिर्याने पाळण्याचे आवाहन केले आहे. 

हजारे म्हणाले, कोरोना विषाणूने संपुर्ण जगालाच विळखा घातला आहे. भारतही त्यापासून काही वेगळा राहिलेला नाही. सैन्यात असताना आपण शस्र, अस्र व बंदुकीच्या गोळ्यांनी लढाई केली. कोरोनाशी लढताना अशा युद्धाची गरज नाही, हा आजार संसर्गजन्य असल्याने शासनाने लॉकडाऊन व  संचारबंदी जाहीर केली. शासनाने घालून दिलेल्या घराच्या बाहेर पडू नका, गर्दी टाळा, सोशल डिस्टन्सिंग पाळा यासह अन्य नियमांचे पालन केले, तर कोरोना पळून जाईल. कोरोनाला पिटाळून लावून आपला देश नक्की विजयी होणार आहे.

लॉकडाऊन काळ सुरू असतानाही काही लोकांना गावागावातील चौकाचौकात जमा होऊन गप्पा मारण्याची चुकीची सवय लागली आहे. मनावर ताबा ठेऊन चौकाचौकात होणारी गर्दी टाळली पाहिजे. लॉकडाऊन जाहिर झाल्यापासून आपण एकही दिवस घराबाहेर पडलो. घरातच राहण्याचा काहीना त्रास होत असला, तरी कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी हा त्रास सहन करण्याची गरज आहे.
आपला जीव धोक्यात घालून कोरोनाशी युद्ध करणारे डॉक्टर्स, नर्स व त्यांचे सहकारी, पोलिस व स्वच्छता कर्मचारी काम करीत असून हे सोप्पे काम नाही. त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहे. प्रत्येकांनी त्यांना धन्यवाद देऊन शासन - प्रशासनाला सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन हजारे यांनी केले आहे.

हजारे यांना विश्वास
जागतिक कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेश दिल्यानंतर जनता कर्फ्युला मोठा प्रतिसाद मिळाला. कोरोनाशी लढण्यासाठी भारत एकसंघ असून, शासन, प्रशासन व जनता एकजुटीने लढा देत आहे. याचे चांगले उदाहरण जगासमोर गेले. लॉकडाऊन काळात घरातच राहून कोरोनाला आपण नक्की हरवू, असा विश्वास हजारे यांनी व्यक्त केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com