नागपुरातून राष्ट्रवादीतर्फे 55 जण लढण्यास इच्छुक 

शहर आणि जिल्ह्यातील काटोल आणि हिंगणा विधानसभा मतदारसंघ वगळून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दहा मतदारसंघातील 82 कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. यात शहरातील 55 तर ग्रामीणमधील 27 जणांचा समावेश आहे.
नागपुरातून राष्ट्रवादीतर्फे 55 जण लढण्यास इच्छुक 

नागपूर : शहर आणि जिल्ह्यातील काटोल आणि हिंगणा विधानसभा मतदारसंघ वगळून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दहा मतदारसंघातील 82 कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. यात शहरातील 55 तर ग्रामीणमधील 27 जणांचा समावेश आहे. 

मुलाखती घेण्याकरीता प्रदेशच्यावतीने एक समिती स्थापन करण्यात आली होती. यात माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, हर्षवर्धन देशमुख, राजेंद्र जैन, धनंजय दलाल यांचा समावेश होता. यावेळी शहर अध्यक्ष अनिल अहिरकर व ग्रामीण अध्यक्ष बाबा गुजर उपस्थित होते. विशेष म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्‍चित झाली आहे. दोन्ही कॉंग्रेसला त्याशिवाय गत्यंतरसुद्धा नाही. अडचण फक्त जागा वाटपाची आहे. आजवर शहरात कॉंग्रेसने एकही जागा राष्ट्रवादीसाठी सोडलेली नाही. ग्रामीणमधील काटोल आणि हिंगणा हे दोनच मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. अनेक वर्षांपासून शहरात किमान एक जागा द्यावी, अशी मागणी सातत्याने राष्ट्रवादीतर्फे केली जात आहे. आता शहरात कॉंग्रेसचा एकही आमदार नाही. सर्वच जागा रिकाम्या असल्याने नेत्यांनी ठरविल्यास शहरातील एखादा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकतो. 

पक्षाच्या आदेशानुसार इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. इच्छुकांची नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात येतील. कॉंग्रेससोबत चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेला जे मतदारसंघ येतील त्यानुसार उमेदवार ठरविले जातील, असे राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले. 

प्रमुख इच्छुक उमेदवार 
दक्षिण पश्‍चिम : महादेवराव फुके, दिलीप पनकुले
दक्षिण : ईश्वर बाळबुधे, डॉ. योगेश कुंभलकर, श्रीकांत शिवणकर, अशोक काटले, राजकुमार नागुलवार. 
पूर्व नागपूर : दुनेश्वर पेठे, जानबा मस्के
मध्य नागपूर :अनिल अहिरकर, नूतन रेवतकर, प्यारुद्दीन उल्फुद्दीन
पश्‍चिम नागपूर : प्रकाश गजभिये, शैलेंद्र तिवारी, गंगाप्रसाद ग्वालवंशी, बाबाराव गावंडे. 
उत्तर नागपूर : वर्षा श्‍यामकुळे, महेंद्र भांगे, विशाल खांडेकर 

याशिवाय इच्छुक उमेदवाराच्या यादीत धनंजय देशमुख, बजरंगसिंह परिहार, प्रकाश लिखाणकर, मिलिंद मानापुरे आदींचाही समावेश होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com