Fifty Fifty Formula will be Key issue in Vidhansabha Election Amonst Sena BJP | Sarkarnama

'फिफ्टी फिफ्टी'चा फॉर्म्यूला युतीत ठरणार कळीचा मुद्दा

उत्तम कुटे
मंगळवार, 7 मे 2019

पिंपरी : लोकसभेला युतीत जागावाटपावरून तू..तू...मैं...मैं.. झाली. पण खरी कसोटी युतीची पिंपरी-चिंचवड,पुण्यासह राज्यात फिफ्टी फिफ्टीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्यूल्यामुळे विधानसभेला लागणार आहे. हा मोठा कळीचा मुद्दा ठरणार असून त्यावरून युतीत दरी निर्माण होण्याचीही भीती आहे. त्यातही उद्योगनगरीच्या तीनपैकी भोसरीच्या जागेवरून युतीत वाद होतील,असा तर्क आहे. 

लोकसभेला २५  (भाजप), २३ (शिवसेना) ,तर विधानसभेला फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्यूल्यावर शिवसेना व भाजपची युती झाली आहे. त्यात आपापल्या जागा दोन्ही पक्षांच्या कायम राहणार आहेत. २००९ ला ११७ (भाजप) व १७१ शिवसेना असा युतीचा जागावाटपाचा फॉर्म्यूला होता. मात्र, गतवेळी २०१४  ला युती फिस्कटली. शिवसेनेने १२६  जागा देऊ केल्या. मात्र, भाजपने त्या नाकारल्या. त्यांना त्यावेळी निम्म्या जागा हव्या होत्या. परिणामी २०१४ ला लोकसभेची युती नंतर विधानसभेला तुटली. स्वतंत्र लढून भाजपने १२३ जागा जिंकल्या. तर शिवसेनेच्या पारड्यात ६५ जागा आल्या. परिणामी नाईलाजाने ते पुन्हा सत्तेसाठी एकत्र आले. 

२००९ ला चिंचवड व भोसरी शिवसेनेने,तर पिंपरी आरपीआयने लढविली होती. तर, गतवेळी २०१४ ला युती आणि आघाडीही नव्हती. त्यामुळे चौरंगी लढती झाल्या. चिंचवडमधून भाजपचे लक्ष्मणभाऊ जगताप,तर पिंपरीतून शिवसेनेचे अॅड. गौतम चाबूकस्वार विजयी झाले. भोसरीमध्ये अपक्ष महेशदादा लांडगे निवडून आले. आपापल्या जागा कायम ठेवायच्या या युतीच्या नव्या फॉर्म्यूलातील मुद्दा विचारात घेतला,तर पिंपरी व चिंचवड हे शिवसेना व भाजपकडे राहणारच आहे. भाऊ हेच चिंचवडमधून भाजपचे उमेदवार असणार हे सुद्धा जवळपास नक्की आहे. फक्त पिंपरीतून पुन्हा विद्ममान आमदारांनाच तिकिट मिळते की ऐनवेळी तो आयात केला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर, भोसरी कळीचा मुद्दा ठरणार आहे. ती कुणी घ्यायची यावरून तू,तू,मैं,मैं होणार आहे. 

दुसरीकडे भाजपकडून उतरण्याची जोरदार तयारी महेशदादांनी केली आहे. मंगळवारी,तर त्यांनी आपल्या वॉररुमचे उदघाटनही भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांच्या हस्ते केले. फिफ्टी फिफ्टीच्या फॉर्म्यूल्यानुसार शिवसेना पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरीवर क्लेम करेल, असा अंदाज आहे.त्यात जर शिरूरमधून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील विजयी झाले,तर भोसरीवरील शिवसेनेचा दावा आणखी मजबूत होणार आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची प्रथमच सत्ता आणण्यात महेशदादांचा मोठा आहे. ही बाब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले त्यांचे जवळचे सबंध पाहता भाजप ही जागा आपल्याकडे घेण्याची दाट शक्यता आहे.

मात्र, तसे झाले नाही, गेल्यावेळेसारखे अपक्ष लढण्याची जोरदार तयारी महेशदादांनी आताच सुरु केलेली आहे. २०१४ ला राष्ट्रवादीने तिकिट नाकारल्याने ते अपक्ष उभे राहिले. नारळ चिन्ह घेऊन त्यांनी बाजी मारत राष्ट्रवादीसह सर्वच उमेदवारांना धोबीपछाड व नारळ दिला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतून त्यांनी विधानसभेची रंगीत तालीमही केली आहे., 

भाऊ हेच चिंचवडमधून भाजपचे उमेदवार असणार हे सुद्धा जवळपास नक्की आहे. फक्त पिंपरीतून पुन्हा विद्ममान आमदारांनाच तिकिट मिळते की ऐनवेळी तो आयात केला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर, भोसरी कुणाकडे राहते,जाते ते काहीही होवो, तेथे महेशदादा उमेदवार असणार हे, मात्र नक्की आहे.

राजकीय घडामोडींच्या बित्तंबातमीसाठी - www.sarkarnama.in
सरकारनामा ट्वीटर - https://twitter.com/MySarkarnama
सरकारनामा फेसबूक - https://www.facebook.com/MySarkarnama/
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख