नवी मुंबईचे १५ नगरसेवक राष्ट्रवादीतच राहणार; अखेरपर्यंत किल्ला लढवणार - अशोक गावडे 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये जाण्यास राष्ट्रवादीच्या १५ निष्ठावान नगरसेवकांनी नकार दर्शवला आहे. हवे तर संपूर्ण नाईक कुटुंब भाजपमधून गेले तरी चालेल, पण अखेर पर्यंत किल्ला लढवू अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे. महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी भाजपात जाण्यास विरोध केला आहे.
नवी मुंबईचे १५ नगरसेवक राष्ट्रवादीतच राहणार; अखेरपर्यंत किल्ला लढवणार - अशोक गावडे 

नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये जाण्यास राष्ट्रवादीच्या १५ निष्ठावान नगरसेवकांनी नकार दर्शवला आहे. हवे तर संपूर्ण नाईक कुटुंब भाजपमधून गेले तरी चालेल, पण अखेर पर्यंत किल्ला लढवू अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे. महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी भाजपात जाण्यास विरोध केला आहे. तसेच लवकरच ते निष्ठावान नगरसेवकांना एकत्र करून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

अशोक गावडे हे शरद पवारांच्या निकटवर्तीय असून पश्‍चिम महाराष्ट्रातील नवी मुंबईत राहणाऱ्या नेत्यांपैकी एक भक्कम राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जातात. 
गेल्या दोन दिवसांपासून नवी मुंबई शहरात भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राजकारण तापले आहे. माजी मंत्री गणेश नाईक, आमदार संदीप नाईक व माजी खासदार संजीव नाईक हे सर्व राष्ट्रवादीतूम भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु, या नेत्यांच्याआधी आपणच भाजपमध्ये जाऊ अशी भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीच्या ५७ नगरसेवकांनी चक्क बैठकच घेतली होती. या बैठकीला निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक व नगरसेविकांनी हजेरी लावून भाजपमध्ये जाण्याची तयारी केली होती. मात्र अशोक गावडे, नगरसेवक सुरेश कुलकर्णी, डॉ. जयाजी नाथ, शंकर शिंदे, नगरसेविका शुभांगी पाटील, शोभा पाटील, अशोक पाटील आदी नगरसेवकांकडून भाजप प्रवेशाबाबत नकारार्थी संकेत मिळाल्याची चर्चा राष्ट्रवादीत सुरू आहे. 

मंगळवारी व्हाईट हाऊसवर संपन्न झालेल्या बैठकीतही काही नगरसेवकांनी आवर्जून कारणे देऊन अनुपस्थित राहण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या गैरहजेरीतून ते पक्षासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्या जो-तो भाजपमध्ये जाण्याशिवाय दुसरे काहीच बोलण्यास तयार नसल्याने राष्ट्रवादीत राहणार तरी कोण असा प्रश्‍न काही निष्ठावान कार्यकर्त्यांना पडला होता. मात्र राष्ट्रवादीतील १५ नगरसेवकांनी आपण आहेत त्याठिकाणीच राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने गणेश नाईकांनाही पुन्हा विचार करण्यास भाग पाडणारी परिस्थिती नवी मुंबईत तयार होत आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील कोणालाही कुठे जायचे असेल तर खुशाल जाऊ शकतात. मात्र आम्ही अखेर पर्यंत नवी मुंबईचा किल्ला लढवू. माझ्यासारखे काही निष्ठावान नगरसेवक राष्ट्रवादीतच राहणार आहेत. लवकरच मी शरद पवारांची भेट घेणार आहे.- अशोक गावडे, नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com