....जेव्हा पवार आजोबांना नातू ड्रायव्हिंगला नेतो! - Sharad Pawar in a car with Grandson Vijay Sule | Politics Marathi News - Sarkarnama

....जेव्हा पवार आजोबांना नातू ड्रायव्हिंगला नेतो!

मिलिंद संगई
रविवार, 6 सप्टेंबर 2020

सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे यालाही आज वाहन चालविण्याचा परवाना मिळाला आणि त्या नंतर त्याने आपल्या आजोबांना म्हणजेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना गाडी चालवत आपल्या ड्रायव्हिंगचा वेगळा आनंद दिला

बारामती : मुले गाडी चालवायला शिकतात तेव्हा त्याचा पालकांना वेगळाच आनंद असतो, मग ते सेलिब्रेटी असले तरी त्याला अपवाद ठरत नाहीत. सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे यालाही आज वाहन चालविण्याचा परवाना मिळाला आणि त्या नंतर त्याने आपल्या आजोबांना म्हणजेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना शेजारी बसवून गाडी चालवत आपल्या ड्रायव्हिंगचा वेगळा आनंद दिला. 

तो क्षण स्वतः शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी मनात साठवून ठेवला. एक आई म्हणून हा आनंद वेगळाच असतो, या शब्दात सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शरद पवारांना ड्राईव्हला घेऊन निघालेला असल्याने गाडी हळू चालव, हॉर्न वाजवू नकोस, अशा सूचना आईने तरीही त्याला दिल्याच. आपल्या गाडीवर एल म्हणजे लर्निंग हे चिन्ह आहे याचीही आठवण सुळे यांनी विजयला करुन दिली. 

पालक म्हणून एक आई म्हणून या छोट्या गोष्टी सगळ्यांना वाटतात, पण आईसाठी या गोष्टी खूप वेगळ्या असतात, आणि आमच्यासाठी विजयचे ड्रायव्हिंग लायसेन्स मिळाल्यानंतर आजोबांना ड्रायव्हिंगला घेऊन जाणे हा क्षण आमच्यासाठी एक स्पेशल मोमेंट आहे अशा शब्दात सुळे यांनी याचे वर्णन केले. या ड्रायव्हिंगच्या अनुभवाचे त्यांनी फेसबुकवरुन लाईव्ह प्रक्षेपण करत हा क्षण सर्वांसाठीच उपलब्ध करुन दिला. ज्येष्ठ नेते शरद पवार शेजारी बसलेले असल्याने विजयने गाडी व्यवस्थित चालवावी, अशीच सुप्रिया सुळे यांची अपेक्षा या वेळी दिसून आली. या अगोदर सुळे यांची कन्या रेवती हिनेही आजोबांना गाडी चालवत नेल्याची दृश्ये माध्यमातून पुढे आली होती. आजचाही क्षण सुळे व पवार कुटुंबियांसाठी अविस्मरणीय असाच होता. 
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख