अगोदर थोडी हिंट होती, मग पवार साहेबांचा थेट फोनच आला!

राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रा. फौजिया खान यांची नुकतीच राज्यसभेवर निवड झाली.
 faujiya khan shares process of candidature
faujiya khan shares process of candidature

परभणी : सहा मार्च रोजी सकाळी पक्षाध्यक्ष शरद पवार साहेबांचा मला फोन आला आणि सांगितले की तुम्हाला राज्यसभेच्या उमेदवारीची तयारी करायची आहे. माझी निवड होणार याची मला अगोदर थोडी हिंट मिळाली होती. परंतु पवार साहेबांनी अचानक दिलेल्या आदेशामुळे मीही अचंबित झाले. ही माझ्यासाठी मोठी संधी आहे, असे राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रा. फौजिया खान यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रा. फौजिया खान यांची नुकतीच राज्यसभेवर निवड झाली. या संदर्भात बोलतांना त्या म्हणाल्या, मला राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल अशी कल्पना देखील नव्हती. परंतू अलीकडच्या काळात कुठे तरी कानावर या गोष्टी पडत होत्या. परंतु 6 मार्च रोजी सकाळी मी परभणी येथे घरी असताना अचानक पक्षाध्यक्ष शरद पवार साहेबांचा फोन आला की तुम्हाला राज्यसभेच्या उमेदवारीची तयारी करायची आहे. त्यानंतर मी तयारीला लागले असे फौजिया खान यांनी सांगितले. 

पक्षाने माझी निवड करून मोठी जबाबदारी दिली आहे. सतत 12 वर्ष राज्यात मंत्री म्हणून काम करतांना कामाचा चांगला अनुभव आलेला आहे. त्यामुळे निश्चित आपण केंद्रातील काम देखील तितक्याच चांगल्या पध्दतीने करू असा मला विश्वास आहे. पक्षावर निष्ठा ठेवून सतत काम करत राहिले. त्या निष्ठेचे फळ मला सातत्याने मिळत राहीले आहे. आता परत पक्षाने माझा सन्मान करून मोठी संधी दिली आहे. त्या संधीचा समाजहितासाठी आपण वापर करणार आहे. यात महिला, अल्पसंख्याक समाजातील लोकांना न्याय देण्याचे काम मी प्राधान्याने करणार आहे. राज्यात काम करत असतांना मी अनेकवेळा दिल्लीत गेले होते. त्या ठिकाणच्या कामाची पद्धत ही जवळून अनुभवली आहे. राज्यसभेत आता मराठवाड्यातील महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण काम करणार आहोत, असेही सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com