बागलाणच्या शिवाजी अहिरेंनी शेतजमीन विकून कन्येला बनविले राष्ट्रीय कुस्तीपटू

वायगाव (ता. बागलाण) या दुष्काळी गावातील शिवाजी अहिरे या पित्याने मुलीला फ्री फाईटर रेसलिंग (एफएफडब्ल्यू) ची कुस्तीपटू बनविण्यासाठी आपली शेतजमीन विकली. त्यांची कन्या वैशाली अहिरे हिनेही पित्याचे योगदान कारणी लावले. विविध स्पर्धांत चमकदार कामगिरी करीत सध्या तीने राष्ट्रीय स्तरावर नावलौकीक मिळविला आहे.
बागलाणच्या शिवाजी अहिरेंनी शेतजमीन विकून कन्येला बनविले राष्ट्रीय कुस्तीपटू

मालेगाव : वायगाव (ता. बागलाण) या दुष्काळी गावातील शिवाजी अहिरे या पित्याने मुलीला फ्री फाईटर रेसलिंग (एफएफडब्ल्यू) ची कुस्तीपटू बनविण्यासाठी आपली शेतजमीन विकली. त्यांची कन्या वैशाली अहिरे हिनेही पित्याचे योगदान कारणी लावले. विविध स्पर्धांत चमकदार कामगिरी करीत सध्या तीने राष्ट्रीय स्तरावर नावलौकीक मिळविला आहे. 

शिवाजी अहिरे यांनी त्यासाठी प्रेरणा घेतली ती अमीर खान यांच्या 'दंगल' चित्रपटापासून. या चित्रपटातील फोगट भगिनी व त्यांचे प्रशिक्षक वडिलांच्या परिश्रमाने ते एव्हढे प्रेरीत झाले की त्यांनी शालेय स्तरावर कुस्तीत खेळणाऱ्या मुलीचे करिअर घडविण्यासाठी हा धाडसी निर्णय घेतला. शालेयस्तर कुस्ती स्पर्धेत राज्य-राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविलेल्या वैशाली अहिरेचा कुस्ती व फ्री फाईटर रेसलिंग (एफएफडब्ल्यू) कसून सराव सुरू आहे. वैशाली सध्या दिल्लीत चंदगीराम आखाड्यात अजिंक्‍य यादव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. 

प्रिन्स आदवंशी यांच्या या संस्थेत सचिन आदवंशी तिला प्रशिक्षणाचे धडे देतात. कुस्तीचे प्रशिक्षण नवीन तंत्र आत्मसात करताना दिल्लीतील प्रीतमपुरात एफएफडब्ल्यूच्या मैदानातही दर रविवारी प्रशिक्षण घेते. या क्रीडा प्रकारात बॉक्‍सिंग, कराटे व कुस्ती या तीनही स्पर्धांचे तंत्र शिकवले जाते. 

या दोन प्रशिक्षणांचा वैशालीचा दरमहा खर्च वीस हजार रुपये आहे. कन्येचा हा खर्च अवघी चार एकर कोरडवाहू शेती असणाऱ्या अहिरे यांच्या आवाक्‍याबाहेरचा होता. कन्येचे परिश्रम व तिने कुस्तीत मिळविलेले यश पाहून त्यांनी भावाला एकरभर शेती विकली. यातूनच वैशाली व तिचे दोन भाऊ गणेश (नववी) व अनिल (सातवी) यांच्या कुस्ती प्रशिक्षणाचा खर्च ते भागवत आहेत. 

वैशालीचे दोघे बंधू गणेश व अनिल कोल्हापूर येथील जुनी मोतीबाग आखाड्यात कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धडे गिरवत आहेत. वैशाली 26 डिसेंबरला कसबे-सुकेणे येथे महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेच्या चाचणीसाठी आली असता मालेगावला सीएम करंडक कुस्ती स्पर्धा असल्याचे समजले. येथे तिने दोन स्पर्धकांना क्षणार्धात चितपट केले. अहिरे हे देखील कुस्तीपटू असून, त्यांनी जिल्हा पातळीवर यश मिळविले आहे. 

वैशालीचा चढता आलेख
वैशालीने कबड्डीमध्ये राज्य संघात चमकदार कामगिरी केली. आठवीपासून तिने कुस्तीकडे लक्ष दिले. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान क्रीडाशिक्षकांनी तीला कुस्तीकडे लक्ष देण्यास सांगितले. भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेत राम यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तीने कुस्तीचे बारकावे जाणून घेतले. जिल्हा, विभागीय, राज्यस्तरीय स्पर्धेत 53 किलो वजनी गटात पदक मिळवले, तिची राज्य-राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. 55 किलो गटात आमदार करंडक स्पर्धेत चांदीची गदा मिळविली. रोहतक (हरियाना) येथे राष्ट्रीय स्पर्धेत दोन कुस्त्या जिंकल्या. सध्या ती केटीएचएम महाविद्यालयात शिकत असुन 56 ते 64 किलो वजनी गटासाठी सराव करीत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com