ऑल  इन द  फॅमिली : ठाकरे पॅटर्न  सहा राज्यांनी यापूर्वीच राबविलाय !

महाराष्ट्रात पहिल्यांदाचउध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या रुपाने बाप-लेकांचं सरकार आले आहे. पण असे प्रकार देशात अनेक राज्यात झालेले आहेत .
Udhhav-&-Aditya-Thackeray
Udhhav-&-Aditya-Thackeray

मुंबई : पिता - पुत्राचे सरकार फक्त महाराष्ट्रात आलेले नाही ,  देशातील सहा राज्यातही असच घडलय ! सध्या मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे महाराष्ट्राची कमान सांभाळात आहेत,  तर त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे.  त्यामुळे 'बापलेकांचे सरकार' म्हणून ओळखल्या जाणारया  या  सरकारवर विरोधक आडून आडून टीका करीत आहेत .


महाराष्ट्रात पहिल्यांदाच  उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या रुपाने बाप-लेकांचं सरकार आले आहे . पण असे प्रकार देशात अनेक राज्यात झालेले आहेत .  2014 मध्ये  आंध्र प्रदेशात टीडीपी (तेलगू देसम पार्टी)चे सरकार आले होते. त्यावेळी चंद्रबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या निवडणुकीत त्यांचा मुलगा नारा लोकेश यांचा  पराभव झाला होता.

त्यानंतर 2017 साली चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या मुलाला विधान परिषदेत घेऊन कॅबिनेट मंत्रीपद दिलं, त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान, पंचायतराज आणि ग्रामविकास ही खाती त्यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यामुळे आंध्र प्रदेशातदेखील चंद्रबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नारालोकेश यांच्यामुळे बाप-लेकांचं सरकार पाहायला मिळालं होतं.

तामिळनाडूमध्ये  2006 ते 2011 मध्ये डीएमके (द्रविड मुनेत्र कझागम) यांचं सरकार होतं. त्यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी होते, तर त्यांचा मुलगा स्टॅलीन यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली होती.

त्यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायतराज अशा खात्यांची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यानंतर 2009 साली त्यांची तामिळनाडूचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती. त्यामुळे तामिळनाडूच्या जनतेने 2006 ते 2011 च्या दरम्यान बापलेकांचं सरकार अनुभवलय, असं म्हणता येईल.


चार वेळा पंजाब राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले   प्रकाश सिंग बादल यांनी  त्यांचा मुलगा  सुखबीर सिंग बादल यास मंत्रिमंडळात घेतले होते तेही एकदा नव्हे दोनवेळा .    शिरोमणी  आकाली दल नेते म्हणून प्रकाश सिंग बादल ओळखले जातात. 2009 साली प्रकाश सिंग बादल हे पंजाब राज्याचे मुख्यंमंत्री असताना त्यांचे पुत्र सुखबीर सिंग बादल यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर हीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जोडी 2012मध्ये देखील पाहायला मिळाली होती . 


तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी 2014 साली तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार हाती घेतला. त्याचवेळी त्यांचा मुलगा के. टी. रामाराव हा कॅबिनेट मंत्री होता , त्यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि पंचायत राज ही खाती देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 2018 साली टीआरएसचं सरकार आलं. त्यावेळी पुन्हा  के. चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री तर के. टी . रामाराव हे कॅबिनेट मंत्री होते.


भारताचे माजी उपपंतप्रधान चौधरी देवीलाल हे दोन वेळा हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री होते. ते दुसऱ्यांदा म्हणजेच 1987 साली मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांचे पुत्र रणजीत सिंह हे देखील कॅबिनेट म्हणून सरकारमध्ये होते. त्यावेळी त्यांच्याकडे कृषीमंत्री पद देण्यात आलं होत.

एकंदरित महाराष्ट्रासोबत हरियाणा, पंजाब, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांनी बाप-लेकांचं सरकार पाहिलं आहे. त्यामुळे घराणेशाहीला घेऊन राज्यात आणि पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादात शिवेसेनेचाही समावेश झाला आहे, हे नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com