farukha abdulla | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

फारुख अब्दुला श्रीनगरमधून विजयी

वृत्तसंस्था
शनिवार, 15 एप्रिल 2017

श्रीनगर : श्रीनगर लोकसभा मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत नॅशनल कॉंफरंसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला विजयी झाले. या निवडणुकीत केवळ साडे सात टक्के मतदान झाले होते. तर काही ठिकाणी फेरमतदान घेण्यात आले होते. गेल्या रविवारी आणि गुरुवारी मतदान झाले होते. 

हिंसाचारामुळे काही ठिकाणी पुन्हा मतदान करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. गेल्या रविवारी मतदानादरम्यान मतदान करण्यासाठी जाणाऱ्या मतदारांवर दगडफेक झाली त्यामुळे मतदानाला अल्पसा प्रतिसाद मिळाला होता. आंदोलक आणि लष्करामध्ये झालेल्या संघर्षात आठ जण मृत्युमुखीही पडले होते. हिंसाचाराच्या घटना लक्षात घेता येथे पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला होता. गेल्या गुरुवारी मतदानही झाले मात्र खूपच अल्पप्रतिसाद मिळाला. या निवडणुकीसाठी नऊजण रिंगणात होते. त्यामध्ये नॅशनल कॉंफरन्सचे फारुख अब्दुल्ला, पीपल डेमोक्रॅटिक पक्षाचे नाझीर अहमद खान यांचा समावेश होता. सत्ताधारी पीडीपी नेते तारिक हमीद यांनी राजीनामा दिल्यानंतर येथे पोटनिवडणूक घेण्यात आली. 
बुडगाम आणि खानसाहिब या विधानसभा मतदारसंघातून तर एकाही मतदाराने मतदान केले नाही. तर चरार ए शरीफ या भागातून केवळ दोन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती येथील निवडणूक अधिकाऱ्याने पत्रकारांना दिली. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख