"शेतकऱ्यांनो, भाजी विकायची का ? '' मुंढेंच्या अटीचे पालन करा ! 

शहरातील दहापैकी सतरंजीपूरा झोन वगळता इतर नऊही झोनमध्ये शेतकऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
"शेतकऱ्यांनो, भाजी विकायची का ? '' मुंढेंच्या अटीचे पालन करा ! 

नागपूर : शहरामध्ये भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना महानगरपालिकेने शहरातील विविध भागांत विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली. दहापैकी नऊ झोनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या ठिकाणी घरोघरी जाऊन विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना आजपासून या जागा उपलब्ध राहणार आहेत.

मात्र महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी घालून दिलेल्या अटींचे पालन करणाऱ्यांनाच शहरात भाजीपाला विकता येणार आहे. 

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कॉटन मार्केट बंद करण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला. त्यामुळे कॉटन मार्केटमध्ये येणाऱ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शहरात भाजीपाला विक्रीस अडचण निर्माण होत होती. यावर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेत दहाही झोनमधील जागांची माहिती घेतली.

या ठिकाणी घरोघरी जाऊन भाजी विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांनी सुरक्षेची काळजी घेत भाजीपाला विक्री करावी, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विक्रेत्यांसाठी मनपातर्फे काही अटी निर्धारित करण्यात आल्या आहेत. या अटींची पूर्तता करणाऱ्यांनाच विक्रीसाठी परवानगी दिली जाणार आहे. आयुक्तांनी पोलिस विभागाला आणि आरटीओला सुध्दा नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 

भाजी विक्रीसाठी अटी 
सोशल डिस्टेसिंगचे पालन करावे, गर्दी होऊ नये म्हणून मार्किंग करावी, मास्क, सॅनिटायजरचा वापर करावा, आरटीओ नियमाप्रमाणे वाहनाची सर्व कागदपत्रे सोबत ठेवावी, वाहन चालकास खोकला, ताप, सर्दी आदी जाणवल्यास त्याने तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. 

झोन निहाय जागा 
लक्ष्मीनगर झोन - जयताळा आठवडी बाजार, धरमपेठ झोन - रामनगर मैदान, यशवंत स्टेडियम, हनुमाननगर झोन - रेशिमबाग मैदान, कलोडे महाविद्यालय बेलतरोडी रोड, इंद्रप्रस्थ सोसायटीची जमीन, ढगे बंगल्याजवळ पिपळा रोड,

धंतोली झोन - उंटखाना मैदान टाटा कॅपिटल हाईट समोर, राजाबक्षा मैदान, भगवाननगर मैदान पोस्ट ऑफिसजवळ, बालाजीनगर मैदान वेनू कॉर्नरजवळ, रेणुका विहार कॉलनी मैदान, नरेंद्रनगर एन.आय.टी. मैदान, नेहरूनगर झोन - आशीर्वादनगर एन.आय.टी. बाजार, 

श्रीनगर मैदान दर्शन कॉलनी, ताजबाग रोड भविष्य निर्वाह कार्यालयापुढील जागा, गांधीबाग झोन - दिघोरीकर मैदान जुना बगडगंज, मनपा शाळा नवी शुक्रवारी मॉडेल मिल चौक गाडीखाना, लकडगंज झोन - सरदार वल्लभभाई पटेल मैदान कच्छी विसा भवनजवळ सतनामीनगर,

भास्कर व्यास मैदान पूर्व वर्धमान नगर, आसीनगर झोन - एच.आर. कॅन्सर हॉस्पिटल कळमना रिंग रोड, दीपकनगर उप्पलवाडी रोड, मंगळवारी झोन - नारा रोड उजव्या बाजूला नारा, क्रिष्णाधाम झिंगाबाई टाकळी, गुमान लॉन गोरेवाडा. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com