कर्जफेडीच्या चिंतेने उस्मानाबादेत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठीचा लढा सुरु असतांनाच मराठवाड्यातील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. संदीप बलभीम शेळके (25) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नांव आहे. खामसवाडी येथे वृध्द आई-वडील आणि अपंग भावासोबत संदीप राहत होता.
कर्जफेडीच्या चिंतेने उस्मानाबादेत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

उस्मानाबाद - सोसायटी, ग्रामीण बॅंकेकडून वडील आणि अपंग भावाने घेतलेले दीड लाखाचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेने ग्रासलेल्या खामसावाडी तालुका कळंब येथील 25 वर्षीय तरुण शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन शुक्रवारी (ता.9) पहाटे आत्महत्या केली.

राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठीचा लढा सुरु असतांनाच मराठवाड्यातील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. संदीप बलभीम शेळके (25) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नांव आहे. खामसवाडी येथे वृध्द आई-वडील आणि अपंग भावासोबत संदीप राहत होता. 5 एकर कोरडवाहू शेतीत राबून हे कुटुंब आपला उदर्निवाह कसाबसा चालवत होते. बलभीम शेळके यांच्या नावावर विविध कार्यकारी सोसायटीचे 35 हजार, ग्रामीण बॅंकेचे 95 हजार तर अपंग भावाच्या नावावर 12 हजारांचे असे एकूण 1 लाख 42 हजारांचे कर्ज होते.

खरीप हंगाम तोंडावर आला असतांना पेरणीसाठी खत, बियाण्यासाठी पैसे कुठून आणायचे या चिंतेत संदीप गेल्या काही दिवसांपासून होता. त्यातच वडील आणि भावाचे कर्ज फेडण्याचा ताण देखील त्याच्या डोक्‍यावर होता. या चिंतेतून संदीपने पहाटेच शेत गाठले आणि लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com