दुग्धाभिषेकाने नाशिकला शेतकरी संपाला सुरवात

शेतमालाला भाव व संपूर्ण कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी दहा दिवसांच्या शेतकरी संपाला आज सुरूवात झाली .
दुग्धाभिषेकाने नाशिकला शेतकरी संपाला सुरवात

नाशिक : शेतमालाला भाव व संपूर्ण कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी दहा दिवसांच्या  शेतकरी संपाला आज सुरूवात झाली . निफाडमध्ये, येवला, नांदगावसह विविध भागातील शेतक-यांनी त्यात उस्फूर्त सहभागी होत ठिकठिकाणी दूध ओतून पुरवठा विस्कळीत केला. त्यामुळे संपाची सुरवात जोरात झाली.

राज्यातल्या शेतक-यांनी १ जुनपासून संपाची हाक दिली आहे.हा संप यशस्वी करण्याचा निर्धार सर्व संघटना,शेतकरी व नेत्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या  मालाला उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव नसणे, केंद्राचे सर्वच शेतमालाबद्दलचे शेतक-यांचे नुकसान करणारे आयात निर्यात धोरण, व्यापारी, उद्योगपती, कारखाने, कंपन्यांना पोषक  शासकीय धोरण, प्रत्येक क्षेत्रातले अनाठायी राजकीयकरण,शेती आणि शेतकर्याबद्दलचा सरकार, प्रशासनाची उदासीनता यासाठी हा संप आहे, असे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले . 

देशातील 133 शेतकरी संघटनांनी  हा संप पुकारला आहे. निफाड येथे शेतकरी रस्त्यावर उतरले. त्यांनी दूधाचा पुरवठा विस्कळीत केला. शहरांना जाणारे दूध रस्त्यावर तसेच नदीत ओतले. संगमनेरजवळ दूधाचा टॅकर अडवून रस्त्यावर दूध सोडले. चांदवड, येवला आणि नांदगावला शेतकरी आंदोलन झाले. नाशिक बाजार समितीत मात्र काही शेतकरी लिलावात सहभागी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com