राज्यातल्या शेतकऱ्यांचा संप सुरु - काही ठिकाणी तीव्रता अधिक (व्हिडिओ व फोटोफिचरसह)

राज्य़ शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी म्हणून हा संप सुरु झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांनी संपावर जाऊ नये, यासाठी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. मात्र ती फोल ठरली. त्यामुळे राज्यातले शेतकरी मध्यरात्री पासून संपावर गेले आहेत.
राज्यातल्या शेतकऱ्यांचा संप सुरु - काही ठिकाणी तीव्रता अधिक (व्हिडिओ व फोटोफिचरसह)

पुणे - शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा उतारा कोरा करावा यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या संपाच्या पहिल्या दिवशी काही ठिकाणी संपाची तीव्रता पहावयास मिळाली. मुंबई- पुण्यासारख्या शहरात भाजीपाला आणि दुधावर आज परिणाम जाणवला नसला तरी संपाची तीव्रता वाढली या मोठ्या शहरांना उद्यापासून फटका बसण्याची शक्यता आहे.

राज्य़ शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी म्हणून हा संप सुरु झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांनी संपावर जाऊ नये, यासाठी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. मात्र ती फोल ठरली. त्यामुळे राज्यातले शेतकरी मध्यरात्री पासून संपावर गेले आहेत. सरकारनामाच्या प्रतिनिधींनी विविध ठिकाणाहून पाठवलेली माहिती पुढीलप्रमाणे-

नगर -गोरेगाव येथून दुध घेवून जाणारा दुधाचा टँकर निघोज (ता. पारनेर) येथे पकडला असता संतप्त शेतकऱ्यांनी दुध रस्त्यावर ओतून देत शासनाचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या संपात निघोजकर सहभागी.....शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य  नाही केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा दिला इशारा.....बाजार समितीत 70 टक्के आवक घटली. किरकोळ विक्री मात्र सुरु होती. वासुंदे चॊक नगर येथे नगर- कल्याण हायवे वरून जाणाऱ्या तरकारी व दूध व इतर शेतीमाल घेऊन जाणाऱ्या गाड्या शेतकऱ्यांनी अडविल्या....

जिल्ह्यातील ३५०० दूध संकलन केंद्रे, ५०० शीतकरण केंद्रे व प्रकल्प बंद राहणार. मुंबईला जाणारे १०लाख लिटर दूध रोखणार. सर्व बाजार समित्या बंद राहणार.  

मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केट मध्ये आज 415 गाड्यांची आवक झाली.

पुणे - मार्केटयार्डातील भाजी मार्केट नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु होते.काल आणलेल्या मालाची विक्री सुरु होती. संपाचा परिणाम उद्यापासून जाणवेल अशी शक्यता इथल्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सातारा - बाजार समिती व भाजी मंडईत सातारा परिसरात शुकशुकाट होता. किरकोळ विक्रेत्यांद्वारे शेती मालाची विक्री सुरू होती.

शिर्डी - शेतकरी संपाचा उद्रेक..दुध वाहतुक करणारी वाहने अडवली...दुध टँकरमधील दुध रस्त्यावर ओतले...शिर्डीत बस स्थानकाजवळील पहाटे ४ वाजताची घटना..हॉटेल साई आसरा समोर काही तरुणांचे कृत्य..दुधाचे दोन टँकर अडवले...

कोल्हापूर - कोल्हापुरात आज सकाळी भाजीपाला सौदे नियमित सुरु होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com