Farmers-Sangharsh yatra-Nashi-loan waiver | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

संघर्ष यात्रा होताच शेतकऱ्यांवर खटले

संपत देवगिरे
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

नाशिक- विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेत शेतकऱ्यांच्या जमिनी एकतर्फी संपादनाच्या विरोधात तीव्र आंदोलनाची घोषणा झाली. मात्र संघर्ष यात्रा जिल्ह्याबाहेर रवाना होताच पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दडपशाही सुरु केली आहे. शिवडे (ता. सिन्नर) येथे विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चॅप्टर केस दाखल करण्याच्या नोटीस देऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. त्यामुळे आता शिवसेना याबाबत काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

समृद्धी महामार्गासंदर्भात लढा उभारणाऱ्या शिवडे गावातील 42 शेतकऱ्यांना सरकारने चॅप्टर केस दाखल करण्याची नोटीस बजावली आहे. ज्यामुळे जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे शेतकरी आणि प्रशासन असा आणखी एक नवा लढा उभा राहीला आहे.शिवडे गावात 7 एप्रिलला झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 42 शेतकऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी मोजणीला तीव्र विरोध केला होता.

त्यावेळी दगडफेक करणाऱ्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला होता. त्यावेळी संबंधितांवर कोणताही गुन्हा दाखल न करता त्यांना सोडण्यात आले होते. त्यानंतर आता आलेल्या नोटीशींमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. शिवसेना सत्तेत आहे. तरीही त्यांचा भूसंपादनाला विरोध आहे. त्यामुळे खरोखर रस्त्यावर उतरता की केवळ राजकीय विरोध करता याविषयी शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.

शेतकऱ्यांनी या नोटीसा स्वीकारलेल्या नाहीत. त्यामुळे या नोटीसा शिवडे ग्रामपंचायतीच्या फलकावर लावण्यात आल्या आहेत. या संदर्भात संघर्ष समिती आता न्यायालयात जाणार आहे. जिल्हा आणि पोलीस प्रशासन बळाचा वापर करून गुन्हे दाखल करते आहे, शेतकऱ्यांना धमकावते आहे, असा आरोप संघर्ष समितीने केला आहे. सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर शेतकरी नक्षली मार्गाने आपला लढा पुढे घेवून जातील असे अॅड. जयदीप, अॅड. सुभाष हारक यांनी सांगीतले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख