सरकारविरोधात टाहो फोडणाऱ्या शेतकऱ्यांचा  ऐन दुष्काळात  भाजपवर लाखो मतांचा पाऊस! 

गेली दोन वर्षे कांदा, द्राक्षांसह सर्व शेतमालाचे भाव कोसळले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः सरकारविरोधात टाहो फोडत होता. शेतकरी आत्महत्या करीत होते. शेतकऱ्यांच्या सोशल मिडीयावर शिव्या शाप देत होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, 'प्रहार'चे आमदार बच्चु कडू, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांसह असा एकही नेता नव्हता ज्यांनी आंदोलन केले नाही. मात्र, लोकसभा निवडणूकीत या भागात भाजपच्या उमेदवाराला सव्वा चार लाख मते मिळालीत. त्यात 2.19 लाख मतांची आघाडी असल्याने दुष्काळात होरपळणाऱ्या या शेतकऱ्यांनी भाजप वर मतांचा पाऊस पाडल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
सरकारविरोधात टाहो फोडणाऱ्या शेतकऱ्यांचा  ऐन दुष्काळात  भाजपवर लाखो मतांचा पाऊस! 

नाशिक : गेली दोन वर्षे कांदा, द्राक्षांसह सर्व शेतमालाचे भाव कोसळले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः सरकारविरोधात टाहो फोडत होता. शेतकरी आत्महत्या करीत होते. शेतकऱ्यांच्या सोशल मिडीयावर शिव्या शाप देत होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, 'प्रहार'चे आमदार बच्चु कडू, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांसह असा एकही नेता नव्हता ज्यांनी आंदोलन केले नाही. मात्र, लोकसभा निवडणूकीत या भागात भाजपच्या उमेदवाराला सव्वा चार लाख मते मिळालीत. त्यात 2.19 लाख मतांची आघाडी असल्याने दुष्काळात होरपळणाऱ्या या शेतकऱ्यांनी भाजप वर मतांचा पाऊस पाडल्याने अनेकांना धक्का बसला आहे. 

गेले वर्षभर नांदगाव, येवला, चांदवड, देवळा, कळवण, निफाड येथील कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः टाहो फोडत होता. शेतमालाला मातीमोल भवा मिळाल्याने कांदा रस्त्यावर ओतत होता. चांदवडमध्ये तर आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत रात्रभर तहसीलदार कार्यालयावर मुक्काम आंदोलन झाले. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दोन वेळा कळवण, सटाणा तसेच निफाडला शेतकरी परिषद घेतली. शरद पवार यांनी याबाबत आवाज उठवला होता. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ याबाबत सतत आवाज उठवत होते. त्यांनी दोन वेळा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. अगदी शिवसेना देखील याबाबत सरकारविरोधात बोलत होती. 

याच बळावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला ही निवडणूक अनुकुल राहील असा राजकीय अंदाज होता. येवला, नांदगाव येथे याच पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार पंकज भुजबळ प्रतिनिधीत्व करतात. शेतकऱ्यांच्या समस्येच्या जोडीलाच येथे तीव्र दुष्काळ आहे. नांदगावला तर सतत जनावरांसह मोर्चे काढले जात होते. भाजप खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या घराबाहेर धरणेही धरण्यात आले. रस्त्यावर व बातम्यांत दिसणारा हा असंतोष सत्ताधारी भाजपच्या डॉ. भारती पवार यांना झालेल्या प्रत्यक्ष मतांची संख्या पाहिल्यावर कुठेही प्रकट झाला नाही.  विरोधी पक्षाच्या कार्यकर्ते, नेत्यांनी तर त्याचा एव्हढा धक्का घेतला आहे की ते त्यावर भाष्यच करत नाहीत. 

सर्वाधिक दुष्काळ व कांदा उत्पादकांची समस्या असलेल्या चांदवड-देवळा मतदारसंघात भाजपला 1,20,703, अत्यंत कठीण व सतत शेतकरी आंदोलने होणाऱ्या नांदगावला 1,15,336, येवल्यात 95,703 तर आंदोलनांबरोबरच शेतकरी आत्महत्या झालेल्या व महाराष्ट्राचा प्रगत व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या निफाडला भाजपच्या डॉ. भारती पवार यांना 93,736 असे चार लाख पंचवीस हजार 336 मते मिळाली. या तुलनेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या धनराज महाले यांना अवघी दोन लाख 19 हजार 402 मते मिळाली. त्यामुळे भाजपला येथुन दोन लाख 19 हजार 367 मतांची आघाडी मिळाली आहे. मतांची ही आकडेवारी डोळे विस्फारणारी आहेत. विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना त्यावर विश्‍वास बसत नाही. त्याचे पडसाद सोशल मिडीयावर देखील पडत आहेत. शेतकरी जो असंतोष बोलून दाखवत होते तो मतांत परावर्तीत होऊ शकला नाही. यामध्ये भाजपने मतदारांना प्रभावीत केले की कॉंग्रेस आघाडीचे नेते, कार्यकर्ते ग्रामीण भागात संदेश व प्रचारात कमी पडले असा प्रश्‍न निर्माण झाला. सध्या त्यावर जोरदार चर्चा झडत आहेत. 

निवडणूकीत शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व व राष्ट्रवादी महत्वाचा वाटला. हमीभाव, शेतकरी आत्महत्या हे सर्व प्रश्‍न त्यापुढे गौण ठरले. हा विचार करुन शेतकऱ्यांनी मोदींना मतदान केल्याचे माहिती मला शेतकऱ्यांनी दिली.त्याचा परिणाम मतदानात दिसला. - हंसराज वडघुले, प्रदेश अध्यक्ष, स्वाभीमानी शेतकरी युवक आघाडी. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com