Farmers deferred on loan waiver biometric work, focus only on Corona: Ajit Pawar | Sarkarnama

शेतकरी कर्जमाफी बायोमॅट्रिक कामाला स्थगिती, फक्त कोरोनावरच फोकस :अजित पवार.

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 मार्च 2020

पुण्यामध्ये लष्कर पाचार करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भाजीपाला विक्रीला सुरूवात झाली आहे.

मुंबई : "" मी सर्व मुस्लिम बांधवांना विनंती करतो की आज शुक्रवारचा दिवस आहे सर्वांनी घरी बसून नमाज पठन केले पाहीजे असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेऊन काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. 

शेतकरी कर्जमाफी बायोमॅट्रिक कामाला स्थगिती देण्यात आली असून सध्या फोकस आणि प्राधान्य हे कोरोना संदर्भात असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. पवार पुढे म्हणाले, की कोकणातील लोक आंबे आणि मासे विकू शकतात.

त्याचप्रमाणे नाशिकमधील द्राक्षे विकू शकतात. पुण्यामध्ये लष्कर पाचार करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भाजीपाला विक्रीला सुरूवात झाली आहे. शेतकरी कर्जमाफी बायोमॅट्रिक कामाला स्थगिती देण्यात आली असून फक्त कोरोनावरच फोकस आणि प्राधान्य आहे.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख