अरे व्वा... लाॅकडाउनची कमाल...शेतक-याच्या दोन्ही मुली शिकल्या ट्रॅक्टर (व्हिडिओ) - Farmers Daughters Learned To Drive Tractor in Lock Down | Politics Marathi News - Sarkarnama

अरे व्वा... लाॅकडाउनची कमाल...शेतक-याच्या दोन्ही मुली शिकल्या ट्रॅक्टर (व्हिडिओ)

संदीप रायपूरे  
सोमवार, 6 एप्रिल 2020

लाॅकडाउनमुळे सारच थांबल. लोकांना आपल्या घरी बसण्याशिवाय पर्यायच उरला नाही. या काळात काहींनी पुस्तकांचा आधार घेतला तर काही आयुष्यात कधी न केलेली काम करू लागले. एका शेतक-याच्या दोन मुलींनी लाॅकडाउनचा फायदा घेत चक्क ट्रॅक्टर चालविण्याच कौशल्य आमत्मसात केलं

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : लाॅकडाउनमुळे सारच थांबल. लोकांना आपल्या घरी बसण्याशिवाय पर्यायच उरला नाही. या काळात काहींनी पुस्तकांचा आधार घेतला तर काही आयुष्यात कधी न केलेली काम करू लागले. एका शेतक-याच्या दोन मुलींनी लाॅकडाउनचा फायदा घेत चक्क ट्रॅक्टर चालविण्याच कौशल्य आमत्मसात केलं. आता तर त्या आपल्या शेतात कामालाही लागल्या आहेत. त्यांना ट्रॅक्टर चालविताना बघून गावातील मंडळी आता तोंडात बोट घालू लागली आहेत.
 
महाराष्ट्रासह संपुर्ण देशात कोरोना व्हायरसने प्रचंड दहशत निर्माण केली आहे. कोरोनाला हरविण्यासाठी प्रशासन, सरॅकार प्रयत्नांची पराकाष्टा करित आहे. याचाच एक भाग म्हणून देशात २१ दिवसाचा लाॅकडाउन करण्यात आला.अशावेळी लोकांना आपल्या घरी राहावे लागत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील खराळपेठ येथील शेतकरी विनोद दुर्गे यांना प्रेरणा व अर्पणा नावाच्या दोन मुली आहेत. त्यांच्या घराला लागूनच अडीच एकर शेती आहे. शेतीच्या कामासाठी त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केला आहे. लाॅकडाउनमुळे सारच काम थांबलेलं. अशात काय कराव म्हणून विनोद दुर्गे यांनी आपल्या दोन्ही मुलींना ट्रॅक्टर शिकविण्याचा निर्णय घेतला. 

मुलीही अतिशय उत्साहाने ट्रॅक्टर शिकण्यास तयार झाल्या. सुरवातीला मोठी मुलगी प्रेरणा ट्रॅक्टर चालवायला शिकली. नंतर तिन आपल्या लहान बहिणीलाही ट्रक्टर शिकविला. या दोन्ही बहिणी आता ट्रॅक्टर चालविण्यात तरबेज झाल्या आहेत. प्रेरणा अकरावीत तर अर्पणा दहावीत शिकते.अभ्यासातही त्या हुशार आहेत.अन कणखर देखिल आहेत. पण आपल्या अंगी कला असाव्यात व त्याचा आपल्या कुटुबिंयाना फायदा व्हावा या हेतूने आपण ट्रॅक्टर शिकण्याचा निर्णय घेतल्याचे प्रेरणानी सांगीतले.

विनोद दुर्गे, त्यांची पत्नी दोघेही शेतात मेहनत घेतात. त्यांच दुसर शेत गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. घराला लागून असलेल्या अडीच एकर शेती व गावापासून दूर असलेल्या दोन एकर शेतात कामाच नियोजन करताना आईवडिलांना होणारा त्रास आम्ही दोघी बहिणी अगदी जवळून बघितला आहे.आता आमच्या ट्रॅक्टर शिकण्यामुळं त्यांना होणारा त्रास बरासचा कमी होईल, असा विश्वास त्यांना आहे. २१ दिवसाच्या लाॅकडाउनमुळ अनेक जण आपल्या घरीच असले तरी काही लोक या लाॅकडाउनचा सकारात्मक फायदा घेत आहेत. विनोद दुर्गे या शेतक-याच्या दोन्ही मुलींनी हे आपल्या कौशल्यातून हे सिध्द केल आहे.आता तर त्या कपाशीचे फणकट काढण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग करू लागल्या आहेत.

 लाॅकडाउन मुळ आम्हीला घरी राहून कंटाळा आला. बाबा सहज म्हणाले बेटा ट्रॅक्टर चालवायला शिकणार का. मग मी तात्काळ तयार झाली. मी ट्रक्टर चालविणे शिकल्यानंतर माझ्या लहान बहिणीला देखिल शिकविले आहे. आम्ही दोघी बहिणी मिळून आता शेतातील काम करून आईवडिलांना मदत करित आहोत  -  प्रेरणा विनोद दुर्गे, खराळपेठ. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख