कृषिमंत्र्यांच्या निवासस्थानावर शेतकऱ्यांची धडक, 45 आंदोलनकर्ते स्थानबद्ध 

कृषिमंत्र्यांच्या निवासस्थानावर शेतकऱ्यांची धडक, 45 आंदोलनकर्ते स्थानबद्ध 

वरुड (जि. अमरावती) : हजारो शेतकरी व सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने आज कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या निवासस्थानावर धोंडी मोर्चा काढला. यावेळी काही शेतकऱ्यांनी मुंडनही केले. कृषिमंत्री व शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी 45 मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले. 

दुष्काळामुळे वाळलेल्या सं त्राझाडांना प्रति झाड पाच हजारांची मदत करावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, तालुका ड्रायझोन मुक्त करावा, शेतीची कामे मनरेगा व नरेगातून करण्यात यावी, प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्यावे, वयोमर्यादा निघून गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना 25 लाख रुपये अनुदान द्यावे, या मागण्यांच्या पूर्ततेसाठी हजारो शेतकरी कृषिमंत्र्यांच्या घरी धडकले. सर्वपक्षीय नेत्यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते.

दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी बैलगाडीत संत्र्याचे वाळलेले झाड व कृषिमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा ठेवला होता. सरकारविरोधी फलक हाती घेऊन पंचायत समिती मार्गावरून हा मोर्चा एक वाजता कृषिमंत्र्यांच्या निवासस्थानी पोचला.

यावेळी त्यांच्या घरासमोर शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. प्रवेशद्वारासमोर वैभव पोतदार, मनोज इंगोले, प्रफुल्ल बहुरूपी, अनिल हिवसे, जनार्दन घोरपडे, प्रदीप खापरे, रमेश कडू, गिरिधर वरठी, हरिभाऊ ठाकरे अशा 14 शेतकऱ्यांनी मुंडण केले. यावेळी पोलिसांनी 45 मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांना वरुड पोलिस स्टेशनमध्ये स्थानबद्ध केले होते. 

मोर्चामध्ये सभापती विक्रम ठाकरे, उपसभापती चंद्रशेखर अळसपुरे, बाजार समितीचे सभापती अजय नागमोते, उपसभापती अनिल गुल्हाने, समाजकल्याण सभापती सुशीलाबाई कुकडे, जि. प. सदस्य देवेंद्र भुयार, सीमा सोरगे, राजेंद्र पाटील, बाबाराव बहुरूपी, मनोज इंगोले, राजेंद्र पाटील, राहुल चौधरी, गिरीश कराळे, अनुराग देशमुख आदी मंडळी तसेच शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. कृषिमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चाने धडक दिल्यावर कृषिमंत्र्यांच्या पत्नी डॉ. वसुधा बोंडे तसेच भाजपच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्ष अंजली तुमराम, राजकुमार राऊत, राजू सुपले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com