गेल्या चार महिन्यात 852  शेतकऱ्यांनी संपवले जीवन 

  गेल्या चार महिन्यात 852  शेतकऱ्यांनी संपवले जीवन 

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास तयार नाहीत. गेल्या जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून राज्यातील 852 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. . 

गेल्या चार महिन्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये विदर्भातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असून विदर्भातील सुमारे 409 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या कालावधीमध्ये कायमचा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या मराठवाडा या विभागातील 291 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तर ऊसाचा पट्टा म्हणून ओळख असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील 19व उत्तर महाराष्ट्रातील 132 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. याच कालावधीमध्ये आजपर्यंत कधीच आत्महत्या न झालेल्या कोकण विभागातील एका शेतकऱ्यांने आत्महत्या केली आहे. मंत्रालयातील सुत्रानुसार गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे 1023 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. 

राज्यातील सुमारे 31 लाख शेतकऱ्यांची कर्ज थकीत आहेत. तर राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 30 हजार पाचशे कोटींची आवश्‍यकता आहे. गेल्या वर्षी राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सलग सामना करावा लागल्याने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे सांगण्यात येत होते. यंदा चांगला पाऊस झाल्याने आत्महत्येच्या सत्र थांबेल असा आशावाद वाटत होता. मात्र, शेतीमालाचे पडलेले भाव, शेतकऱ्यांना खते, बि-बियाणे, किटकनाशके खरेदी करण्यास असलेली अर्थिक अडचण आदी कारणांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झालल्याचा दावा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केला आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी म्हणून विरोधकांची संघर्ष यात्रा सुरू आहे. तर सत्ताधारी शिवसेनेचे कर्जमाफीसाठी शिवसंवाद अभियान सुरू असून शेतकऱ्यांच्या कर्जामुक्तीसाठी विशेष अधिवेशनही घेण्याची मागणी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गेल्या 160 दिवसांमध्ये 852 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यांने दररोज सरासरी 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे चित्र पुढे आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com