farmer subhash patil's memory about sharad pawar | Sarkarnama

'लोक माझे सांगाती' वाचतात आणि 'ते' कर्करोगाशी लढतात!

संपत मोरे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस.

जळगाव जिल्ह्यातील नेरी या गावात सुभाष पाटील नावाचे एक शेतकरी आहेत. ते पाटबंधारे विभागात नोकरीला होते. त्यांच्या कळत्या वयापासून ते शरद पवार यांचे चाहते. पवार यांनी शेतकरी दिंडी काढलेली तेव्हा त्यांचं भाषण सुभाष पाटील यांना खूप भावलेलं. ते पवार यांच्या प्रेमातच पडले.  

शासकीय नोकरीतून निवृत्त झाल्यावर पाटील हे पवार यांना आदर्श मानून शेती करू लागले. प्रयोगशील शेती केली .यादरम्यान त्यांच्या आयुष्यात एक वाईट घटना घडली. त्यांना कर्करोगाने गाठले. कर्करोग झालाय या जाणीवेने ते रोज रडायचे. एक दिवस त्यांचा भाचा स्वप्नील चौधरी यांनी त्यांना एक पुस्तक वाचायला दिले, "लोक माझे सांगाती".

ते पुस्तक वाचून त्यांचं आयुष्य बदललं. त्यांची कर्करोगाची भीती पळाली. त्यांनी त्या पुस्तकात शरद पवार यांनी कर्करोगाशी दिलेला लढा आणि त्यावर केलेली मात वाचली. ते म्हणाले,"माझे साहेब जर असाध्य रोगाशी लढू शकतात तर मी का नाही. मीही कर्करोगाला हरवणार, जिंकणार. "मग ते तेव्हापासून आजअखेर 'लोक माझे सांगाती" सातत्याने वाचत आहेत. कर्करोगाशी लढत आहेत 'साहेब आणि साहेबांचे पुस्तक वाचून मला लढण्याचे बळ मिळाले आहे' ते सांगतात.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख