उत्तर महाराष्ट्रात शेतकरी आंदोलनांचा धडाका  मंत्री भामरेंच्या घरासमोर निदर्शने  - farmer strike | Politics Marathi News - Sarkarnama

 उत्तर महाराष्ट्रात शेतकरी आंदोलनांचा धडाका  मंत्री भामरेंच्या घरासमोर निदर्शने 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 7 जून 2017

नाशिक : शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी आज सातव्या दिवशीही उत्तर महाराष्ट्रात शेतकरी संघटनांकडून आंदोलनांचा धडाका सुरुच राहिला. बुधवारी जिल्ह्यातील नेत्यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली. केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांच्या घरावर मोर्चा काढला. 

नाशिक : शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी आज सातव्या दिवशीही उत्तर महाराष्ट्रात शेतकरी संघटनांकडून आंदोलनांचा धडाका सुरुच राहिला. बुधवारी जिल्ह्यातील नेत्यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली. केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांच्या घरावर मोर्चा काढला. 

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे. या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्‍यातील हाकेड येथे सकाळी 9 वाजता रास्ता रोको झाला. जळगाव जिल्ह्यात अन्य दोन ठिकाणी रास्ता रोको करण्यात आल्याचे किसान क्रांती मोर्चाचे जळगाव जिल्हा समन्वयक एस. बी. पाटील यांनी सांगितले. भुसावळ येथे शेतकऱ्यांनी सामुदायिक मुंडन करुन सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला. धुळे जिल्ह्यात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने संपाच्या पहिल्या दिवसांपासून आंदोलने करण्यात येत आहेत. 

नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागातून भाजीपाला शहरात आलेला नाही. नाशिक बाजार समितीत दररोज साडे तीन कोटीची उलाढाल होते. काल संपाच्या सातव्या दिवशीही बाजार समितीच्या आवारात भाजीपाल्याची कोणतीही आवक झाली नाही. नाशिक येथे गंगाघाटावर बुधवारी आठवडी बाजार भरतो. काल या बाजारात भाजीपाल्याचा तुटवडा जाणवला. काही किरकोळ व्यापाऱ्यांकडून भाजीपाला विक्री सुरु ठेवली असतांना त्यांनी संपाचे कारण सांगत दरात तीन पटीने वाढ केली होती. दरम्यान गुरुवारी राज्यभरातील सर्व शेतकरी संघटनांची नाशिक येथे बैठक होत असून या बैठकीत शेतकरी संपाची पुढील दिशा स्पष्ठ होणार असल्याचे सांगितले जाते. या बैठकीकडे उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

शुक्रवारी ठरणार संपाची रणनिती 
राज्यभरातील संपाबाबत सरकारने आतापर्यंत ताठर भूमिका घेतली आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देता पुढील रणनिती काय असावी? याबाबत राज्यातील सर्व शेतकरी संघटनांची व शेतीतज्ज्ञांची विशेष बैठक गुरुवारी (ता. 8) येथे होणार आहे. त्यात पुढील दिशा ठरेल. देण्यासाठी आता कोअर कमिटी केली जात असून या कमिटीत कोण सदस्य असतील या शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा संघटना, भूमिपूत्र संघटना, किसान सभा, किसानसभा, भूमाता आंदोलन, छावा क्रांतीवीर संघटना यासह राज्यातील सर्व शेतकरी संघटनांचे अध्यक्ष या बैठकीत उपस्थित राहतील. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख