पोलिस बंदोबस्तात  मुंबईकरांना दुध पुरवठा  - farmer strike | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिस बंदोबस्तात  मुंबईकरांना दुध पुरवठा 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 जून 2017

मुंबई : महाराष्ट्रातील बळीराजा संपावर गेल्यामुळे मुंबई व मुंबईलगतच्या उपनगरामध्ये दुधबाणीचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. दररोज 80 लाख लीटर दुधाची तहान असणाऱ्या मुंबईकरांना बुधवारी जेमतेम नऊ लाख लीटर दुधाचा पुरवठा झाला आहे. मुंबई शहराकडे येणाऱ्या दुधाच्या वाहनांना राज्य सरकारकडून पोलिस बंदोबस्त दिल्यामुळे किमान इतके दुध मुंबईकरांना उपलब्ध झाले आहे. 

मुंबईकरांना दररोज 80 लाख लीटर दुध लागते. यापैकी दररोज 55 लाख लीटर दुध पिशव्यांमधून तर उर्वरित 25 लाख लीटर दूध खुल्या स्वरूपात उपलब्ध होते. 80 लाख लीटर दुधामध्ये गोकुळचे 8 लाख लीटर, वारणाचे 2 लाख लीटर, प्रभातचे 60 हजार लीटर, महानंदाचे अडीच लाख लीटर, सोनईचे 50 हजार लीटर,राजहंसचे50 हजार लीटर, गोदावरीचे 30 हजार लीटर, स्वराजचे 30 हजार लीटर, मदर डेअरीचे 2 लाख 20लीटर दुधाचा समावेश आहे. 

बुधवारी गोकुळचे 6 लाख लीटर, वारणाचे 2 लाख लीटर, महानंदाचे 40 हजार लीटर, प्रभातचे 60 हजार लीटर दुध पोलिस बंदोबस्तात मुंबईकरांना उपलब्ध झाले. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बळीराजाच्या संपामुळे आजही मोठ्या प्रमाणावर दुध संकलन होतच नसल्यामुळे नवी मुंबईतील दुध डेअऱ्यांपर्यत दूध पोहोचलेच नाही.

आज रात्री उशिरापर्यत 30ते 35 लाख लीटर दूध पोलिस बंदोबस्तात उपलब्ध होण्याची शक्‍यता दूध डेअरीच्या व्यवस्थापकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसात बळीराजाच्या संपाचा निर्णय न लागल्यास मुंबईकरांना दुधाला मुकावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख