Farmer Sent Onions to Donald Trump | Sarkarnama

कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून डोनाल्ड ट्र्म्प यांना गांधी टोपी व कांदा सप्रेम भेट!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दांपत्य दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या मेजवानीत कांद्याचा वापर करावा यासाठी नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी कांदे पाठवले आहे. साठे हे एक सामान्य शेतकरी असून अवघी दोन एकर शेती ते करतात. शेतात कांदा पिकाची लागवड दरवर्षी करत असतात

नाशिक : महाराष्ट्राचा कांदा आरोग्यास चांगला आहे, या स्पष्टीकरणासह आपणही खा अन्‌ अमेरिकेत निर्यात करा. त्यामुळे आम्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याचे जीवनमान उंचावेल. आम्ही कर्जमुक्त होऊ, असे भावनीक आवाहन नैताळे येथील शेतकरी दांम्पत्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलनिया ट्रम्प यांना केले आहे. त्यासाठी त्यांनी ट्रम्प दांम्पत्याला गांधीटोपी, उपरणे, साडी व कांदे या भेटीसह पत्र लिहिले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दांपत्य दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या मेजवानीत कांद्याचा वापर करावा यासाठी नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी कांदे पाठवले आहे. साठे हे एक सामान्य शेतकरी असून अवघी दोन एकर शेती ते करतात. शेतात कांदा पिकाची लागवड दरवर्षी करत असतात.

यंदा देखील कांद्याची लागवड केली आणि अवकाळी पावसामुळे कांद्याचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादन घटले उत्पादन कमी झाल्याने कांद्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती मात्र केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील कांद्यावर निर्यात बंदी केली. इतर देशांना सर्वाधिक महाराष्ट्राचा कांदा पसंत असूनही कांद्या निर्यात होत नाही. त्यामुळे भाव कोसळले आणि शेतकऱ्याचा कांदा उत्पादनासाठी केलेला खर्च देखील वसूल होत नसल्याने साठे हवालदिल झाले.

अमेरिकेच्या जनतेला कांदा खाण्यास योग्य आहे. तो अगोदर तुम्ही खाऊन पहा आणि नंतर तोच कांदा अमेरिकेत पाठवा अशी विनंती मोदी यांना करून निर्यात बंदी उठवण्याचे आवाहन करा, असे पत्र त्यांनी पाठवले आहे. भारत हा कृषी प्रधान असून येथे शेतकऱ्यांचे सर्वाधिक शोषण होत आहे. शेतीला हमी भाव मिळत नाही, स्वामिनाथन आयोग लागू होत नाही, खते ,बियाणे यांच्या किंमती कमी होत नाही. त्यामुळे शेतकरी वर्षानुवर्षे कर्जबाजारी होत चालला आहे.

या संदर्भात ट्रम्प यांनी भारत सरकारला मार्गदर्शन करावे असे आवाहन साठे यांनी केले आहे. साठे यांनी नुकतीच स्पीड पोस्टने कांदे आणि पत्र पाठवले आहे. आजवर कादा विधानसभा, संसद, विविध समारंभ, निवडणुकांतील राजकीय नेत्यांच्या सभांतून गाजला होता. आता तो थेट अमेरिकेच्या अध्यक्षापर्यंत पोहोचला तर त्याची चर्चा तर होईलच, अशी स्थिती आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख