शेतकरी कर्जमाफीची यादी तालुका स्तरावर झळकणार

 शेतकरी कर्जमाफीची यादी तालुका स्तरावर झळकणार

मुंबई : राज्यातील ज्या शेतकऱयांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली आणि कोणाला नाकारली त्याची संपूर्ण यादी दोन दिवसांत सहकार विभागाच्या तालुकास्तरावरील सहाय्यक उपनिबंधक कार्यालयात लावण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. 

त्यामुळे कोणाला कर्जमाफी झाली, कोणाला का नाकारली याची इत्थंभूत माहितीच सर्वसामान्य शेतकऱयांना उपलब्ध होणार आहे.

शेतकऱयांच्या डोक्‍यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने तब्बल 35 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना जाहीर केली होती. त्यानुसार लाखो शेतकऱयांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले होते, मात्र काही शेतकऱयांचे कर्ज माफ झाले तर काहीजण कर्जमाफीसाठी अपात्र ठरले. त्यामुळे शेतकरीवर्गामध्ये मोठी नाराजी पसरली होती. 

तसेच आपल्याला का कर्जमाफी झाली नाही यावरूनही त्यांच्यामध्ये गोंधळाची परिस्थिती होती. त्याची गंभीर दखल घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना पीक विमा नाकारणाऱ्या विमा कंपन्यांविरोधात काढलेल्या मोर्चादरम्यान सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्जमाफीची माहिती व्हावी म्हणून त्याची यादी जाहीर करण्याचे आवाहन केले होते. तसेच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखिल जनआशिर्वाद यात्रे दरम्यान शमतक-यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com