कर्जखाते असणाऱ्या बॅंकेला तत्काळ आधार क्रमांक द्या

कर्जखाते असणाऱ्या बॅंकेला तत्काळ आधार क्रमांक द्या

मुंबई : ज्या बॅंकांमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज खाते आहे, त्या बॅंकेला सर्व शेतकऱ्यांनी तत्काळ आधार क्रमांक नोंद करावा, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे केले.

देशमुख म्हणाले, सर्व कर्जदार शेतकऱ्यांची माहिती बॅंकेकडून मागविण्यात आली आहे, मात्र काही बॅंकांनी शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नोंद नसल्यामुळे ही माहिती देण्यास विलंब होत असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ज्या बॅंकेमध्ये कर्जखाते आहे, त्या बॅंकेत तत्काळ आपला आधार क्रमांक नोंद करावा आणि बॅंकेनेसुद्धा शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकांची नोंद घेऊन कर्जमाफीसाठी लागणारी सर्व कर्जखात्यांची अचूक माहिती शासनाला वेळेत द्यावी, अशा सूचना बॅंकांना केल्या. 

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक मर्यादित, मुंबई येथे राष्ट्रीयकृत बॅंका व खासगी बॅंकाची कर्जमाफीसंदर्भात शेतकऱ्यांची ऑनलाईन माहिती संकलनाबाबत सहकार विभागाची आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू, वरील सर्व बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
या बैठकीत बॅंकांकडून येणाऱ्या माहितीच्या अडचणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. 

एकूण 33 बॅंकांपैकी 27 बॅंकांनी 50 टक्‍यांपेक्षा जास्त माहिती बॅंकस्थरावर भरण्यात आल्याचे सांगितले. मात्र काही शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नसल्यामुळे संपूर्ण माहिती देण्यास विलंब होत असल्याचे बॅंकांनी सांगितले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक संबधित सर्व बॅंका/विकास संस्था यांच्याकडे तत्काळ नोंद करावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com