कर्जमाफी म्हणजे लबाडा घरचं निमंत्रण : राजू शेट्टी 

farmer issue government telling lies raju shetty
farmer issue government telling lies raju shetty

कोल्हापूर : महापुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे "लबाडा घरचे जेवणाचे निमंत्रण' अशा स्वरूपाची आहे, अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. 

शासनाने कालच पुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भातील अध्यादेश काढला. त्याबाबात श्री. शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या कर्जमाफीवर टीका केली. 

श्री. शेट्टी म्हणाले,"ज्यादिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुराने बाधित शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली, त्याचवेळी आपल्याला यात गोलमाल आहे असे वाटले होते. खेडेगावांत एक म्हण आहे लबाडा घरचे जेवणे जेवल्याशिवाय खर नसते, तशीची परिस्थिती या कर्जमाफीची आहे.

या अध्यादेशाची खरोखरच काटेकोरपणे अंमलबजावणी करायची असेल तर 1 एप्रिल ते 14 ऑगष्ट या काळात ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतले तेच या माफीत पात्र ठरतील. 

तथापि या महापुरात प्रचंड नुकसान हे ऊस, केळी, भाजीपाला, फळबावा या पिकांचे झाले आहे. यासाठी एप्रिलच्या आधी म्हणजे गेल्या अर्थिक वर्षात कर्ज काढून ही पिके उभा केली आहेत. केवळ 2018 मध्ये कर्ज घेतले म्हणून ते माफीस पात्र ठरत नसतील तर याचा अर्थ याचा लाभ फक्त 20 टक्के पूरबाधित शेतकऱ्यांनाच न्याय मिळणार आहे.' 

ते म्हणाले,"या निर्णयाने सुमारे 80 टक्के पूरबाधित क्षेत्रातील शेतकरी वाऱ्यावर सोडला जाणार आहे. हे सरकार शेतकऱ्यांची कशी फसवणूक करते याचे हा अध्यादेश म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. शासनाने हा अध्यादेश बदलून 2018 मध्ये पिकांसाठी घेतलेलेही कर्ज माफ केले पाहीजे ही आपली भुमिका आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com