सिमला मिरचीच्या वीस किलोच्या क्रेटला 15 रूपयांची बोली.. चिडलेल्या शेतकऱ्याने मोफत वाटली!

कोरोनामुळे शेतीमालाचे भाव असे पडले आहेत की शेतकऱ्याला ते मोफत वाटल्याशिवाय पर्य़ाय राहिला नाही.
mirchi-farmer-free-29fina
mirchi-farmer-free-29fina

नाशिक : शेतकरी व्यवस्थेचा बळी ठरतो. अपमान सहन करतो. आत्महत्या करतो. अशा कितीतरी गोष्टी त्याला आयुष्यभर चिकटल्या आहेत. आज येथील सुनिल उगले या शेतकऱ्याने स्वतःला आणखी एक बिरुदावली लावून घेतली. व्यवस्थेला शरण न जाता दातृत्वाची.

झाले असे की, सिमला मिरचीचा ट्रॅक्‍टर घेऊन बाजारात आल्यावर 20 किलोच्या क्रेटला व्यापाऱ्याने 15 रुपयांची बोली लावली. या शेतकऱ्याने तडक ट्रॅक्‍टर गावात आणून संचारबंदीने अडकलेल्यांना घरोघर जाऊन मोफत वाटला.

खेडगाव (ता. दिंडोरी) हे द्राक्ष आणि वाईनमुळे एकेकाळी घरोघर डॉलरची भाषा बोलणाऱ्या प्रगतशील शेतीचे गाव. आज सकाळी येथे सुनील उगले हे शेतकरी ओरडून ओरडून "कोरोना'मुळे अडकून पडलेले मजूर, गावातील गरीबांना मोफत सीमला मिरची वाटत होते. नागरिक देखील भाजीपाल्याची गरज भागल्याने या शेतकऱ्याला दुवा देत होते. मात्र माहिती घेतल्यावर वेगळीच व्यथा पुढे आली .

एक एकर सिमला मिरची लागवड केलेले उगले हे आज वीस किलोचे शंभर क्रेट घेऊन नाशिकच्या बाजार समितीत गेले तेव्हा व्यापाऱ्याने 15 रुपये क्रेट हा भाव पुकारला. खेडगाव ते नाशिक क्रेटचे भाडेच पंधरा रुपये होते. त्यामुळे संतापलेल्या उगले यांनी गाडी तशीच परत गावात आणली. गावात जाऊन ग्रामपंचायतच्या ट्रॅक्टरमध्ये ती भरली व गरीब, मजुर व गरजुंना ती वाटून टाकली.

श्री. उगले म्हणाले, माझ्यावर द्राक्षांसह आठ लाखांचे पीक कर्ज व पंधरा लाखांचे हाऊसिंग कर्ज आहे. दोन लाख रुपये किटकनाशक व्यापाऱ्याचे देणे आहे. अशा स्थितीत 15 रुपये खुडण्याला, 15 रुपये भाड्याला, चाळीस रुपये लागवडीला खर्च असतांना 15 रुपयांत वीस किलो म्हणजे सत्तर पैसे किलोने विकून तोटाच होता. त्यापेक्षा मी गावात येऊन ही मिरची मोफत वाटली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com