Farmer Bhusare gets 46 thousand in one day | Sarkarnama

पिडीत रामेश्व भुसारे यांच्या खात्यात  एका दिवसात जमा झाले ४६ हजार रूपये

ब्रह्मदेव चट्टे
बुधवार, 29 मार्च 2017

दिवसभरातून मला लोकांचे फोन येत आहेत. लोक मला आधार देत असल्याचे बघून माझ्या डोळ्यांतून पाणी आले. काही पत्रकारांचेही मला फोन आले. मी एकटा नसून माझ्या गावकऱ्यांसह देशातील लोकही माझ्यासोबत आहेत. याचा मला आधार वाटतो.

– रामेश्वर भुसारे, घाटशेंद्रा ता. कन्नड जि. औरंगाबाद   

मुंबई : मंत्रालयात मारहाण झालेल्या पिडीत रामेश्वर भुसारे या “बळीराजाला साथ द्या” या आवाहानाला समाजातून प्रतिसाद मिळत आहे. भुसारे यांच्या खात्यात देशभरातून मदतरूपी ४६ हजार रूपये जमा झाले आहेत.

रामेश्वर हरिभाऊ भुसारे या अल्पभुधारक शेतकऱ्यांने आपल्या एक एकर शेतात जानेवारी 2015 मध्ये शेडनेट बसवण्यासाठी स्वताजवळेचे आणि मित्रांकडून 10 लाख रूपये खर्च केले. मात्र, 11 एप्रिल 2015 व 14 एप्रिल 2015 रोजी आलेल्या वादळी वारे व गारपीठीने त्यांचे शेडनेट पिकासहित जमीनदोस्त झाले. गारपीठीत उध्दवस्त झालेल्या शेडनेटला पुन्हा उभारण्यासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून रामेश्वर भुसारे दोन वर्षापासून सरकारकडे पाठपुरावा करत आहेत.

बँकेने भुसारे यांना 16 लाख 22 हजार 967 प्रकल्प खर्चापैकी 12लाख 17 हजार 225 इतके बँक लोन, तर 4 लाख 5 हजार 742 इतके म्हणजे 25 टक्के रक्कम भरण्यास सांगितले. आपल्याला मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत मिळावी म्हणून गेल्या दोन वर्षापासून पाठ पुरावा करत होते. यासाठी रामेश्वर भुसारे मुख्यमंत्र्यांना भेटायला २३ मार्चला आले होते. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांना जरब मारहाण करून त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे बळीराजाला साथ द्या आवाहान करण्यात आले आहे. या आवाहानाला चांगला प्रतिसाद देत समाजातील दानशुर लोकांनी भुसारे यांच्या बॅंक खात्यामध्ये एका दिवसात ४६ हजाररूपये जमा केले आहेत.

आरटीजीएस, एनएफटीच्या माध्यामातून त्यांच्या खात्यात ४६ हजार रूपये जमा झाले आहेत. खाते उघडल्यापासून त्यांच्या खात्यात पाचशे रूपये जमा होते. त्यांचे खात्यात इतके पैसे जमा झाल्याने आम्हालाही आश्चर्य वाटत आहे. -
अविनाश शिवाजीराव मते, बॅंक मँनेजर चिंचोली लिंबाजी, ता. कन्नड जि. औरंगाबाद

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख