" कर्जमुक्ती'च्या व्हिडिओतील छेडछाडीची शासनाकडून गंभीर दखल

" कर्जमुक्ती'च्या व्हिडिओतील छेडछाडीची शासनाकडून गंभीर दखल

मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून याचा ट्युटोरियल व्हिडिओ ( प्रशिक्षण चित्रफित) शेतकऱ्यांच्या माहितीसाठी मोबाईलवर पाठविण्यात आला आहे.

या मोबाईल लिंकमध्ये झालेल्या छेडछाडीची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना काही शंका असल्यास मंत्रालयस्तरावर संपर्क कक्षाद्वारे त्यांना योजनेची संपूर्ण माहिती देण्यात येत आहे. 

ही योजना दि. 27 डिसेंबर 2019 च्या शासननिर्णयान्वये जाहीर करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी सुरु आहे. ही शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. सदर योजना पुढील खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

सदर योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी शेतकऱ्यांसाठी एक ट्युटोरियल व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. हा व्हिडिओ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 

कृषी विभागानेसुद्धा हा टयुटोरियल व्हिडिओ (प्रशिक्षण व्हिडिओ) एस.एम.एस. प्रणालीद्वारे त्यांच्याकडे उपलब्ध एम.किसान पोर्टलवर उपलब्ध शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबरवर उपलब्ध करून दिलेला आहे. परंतू, शासनाच्या असे निर्दशनास आले आहे की, कृषी आयुक्तालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकमध्ये छेडछाड झाली आहे. 

शासनाने या बाबीची गंभीर दखल घेतली आहे आणि यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेले आहेत. सोबतच सर्व शेतकऱ्यांना या ट्युटोरियल व्हिडिओची योग्य लिंक कृषी आयुक्तालयामार्फत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु केली आहे. 

शेतकऱ्यांना यासंदर्भात काही शंका असल्यास त्यांचे शंकासमाधान करण्यासाठी मंत्रालयस्तरावर संपर्क कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षातील दूरध्वनी क्रमांक ,8657593808,/8657593809, /8657593820 असे असून त्यावर कार्यालयीन कामकाजाच्यावेळेत संपर्क करता येईल. 

 योजनेच्या सविस्तर माहितीसाठी http:/mjpsky.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देता येईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com