ओम फट स्वाहा....'तात्या विंचू' ही सांगतोय #GoCorona

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना समाज माध्यमांवर गो कोरोना हॅशटॅग वाऱ्यासारखा पसरत आहे. अनेक कलाकारही आपल्या परीने जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत
Famous Charachter Tatya Vinchu telling Go Corona
Famous Charachter Tatya Vinchu telling Go Corona

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे यांचा 'झापटलेला' हा चित्रपट अनेकांना आठवत असेल. स्वतः महेश कोठारे यांनी त्यात पोलिस इन्स्पेक्टरची भूमीका केली होती. (स्व.) अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी या चित्रपटात अफलातून भूमीका केली होती. या चित्रपटाचे प्रमुख पात्र होते खलनायक 'तात्या विंचू' एक बोलका भावला.

शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांनी हा बाहुला साकारला होता. आज हाच 'तात्या विंचू' तोंडाला मास्क लावून करोना बाबत घेण्याच्या काळजीची जनजागृती करतो आहे. रामदास पाध्ये आणि नव्या पिढीचे शब्दभ्रमकार सत्यजित पाध्ये यांनी आपल्या ट्वीटरवरुन तात्या विंचूच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.  

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना समाज माध्यमांवर 'गो कोरोना' हॅशटॅग वाऱ्यासारखा पसरत आहे. सध्या चित्रीकरण बंद असल्याने कलाकार घरातील छायाचित्रे पोस्ट करत आहेत. टिकटॉक अॅपवरही कोरोनासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

माधुरी दीक्षित, बिपाशा बासू, श्रद्धा कपूर आणि अन्य कलाकारांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून काही दिवस घरातच थांबण्याचा सल्ला चाहत्यांना दिला आहे. दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा यांनी स्वच्छतेबाबत सूचना देणारे व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर केले आहेत. 'बिग बी' अमिताभ बच्चन यांनी कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी घरातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने 'होम क्वारंटाईन' शिक्का उमटवलेल्या आपल्या हाताचे छायाचित्र ट्‌विटरवर प्रसिद्ध केले. कोरोनापासून बचावासाठी त्यांनी काही टिप्सही चाहत्यांना दिल्या आहेत.

चित्रनगरी बंद

चित्रपट, मालिका, वेबसीरिज, जाहिरातींचे चित्रीकरण पूर्णपणे ठप्प झाले आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या प्रवेशद्वारावरच 'चित्रनगरी बंद' असा फलक लावण्यात आला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com