शेतकऱ्यांच्या आडून विरोधकांचा  संप चिघळविण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री 

शेतकऱ्यांच्या आडून विरोधकांचा  संप चिघळविण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री 

मुंबई : शेतकऱ्यांच्या नावावर राज्यातील काही लोक राजकारण करीत आहेत. ज्यांच्या संघर्षयात्रेला पाठिंबा मिळाला नाही तिच मंडळी शेतकऱ्यांच्या संपाच्या आडून हिंसा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्याला रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही ठिकाणी दगडफेक झाली आहे. यामागेही कोण आहेत हे आम्हाला माहित आहे असे स्पष्ट करताना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देता येणार नाही असा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. 

शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी देण्याबरोबर विविध मागण्यासाठी राज्यातील शेतकरी संपावर गेला आहे. या संपाला पहिल्या दिवशीच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. संपाच्या पार्श्‍वभूमी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. मुख्यमंत्री म्हणाले, की शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर राजकारण करू नका असे आवाहन मी राज्याचा प्रमुख म्हणून करतो आहे. पण, तसे होताना दिसत नाही. 
शेतकरी संपाच्या आडून कोण राजकारण करीत आहे हे सांगण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. संप व्हॉलंटरी असायला हवा असे माझे मत आहे. शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याबाबत सरकार केंव्हाही चर्चा करण्यास तयार आहे. मात्र संपामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होत आहे हे लक्षात घ्यायला हवे. नगर जिल्ह्यात दूध संकलन करणाऱ्या संस्थांनी दूधाला योग्य तो भाव दिला पाहिजे. दूध संघाने शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. 

संपावरील शेतकऱ्यांचा पोलिसांशी संघर्ष व्हावा. प्रश्‍न चिघळावा असे संपा आडून काही लोक प्रयत्न करीत असले तरी त्याचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. कॉंग्रेस राजवटीत शेतकऱ्यांना जितका फायदा झाली नाही तितका फायदा आमच्या काळात झाला आहे. याकडे लक्ष वेधत मुख्यंमत्र्यांनी केलेल्या मदतीची आकडेवारीही कथन केली. 

नेत्यांचेच ब्रॅंड बनले 
गुजरातमध्ये अमूलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. शेतकऱ्यांचा एक ब्रॅंड झाला. महाराष्ट्रात मात्र तसा ब्रॅंड निर्माण होऊ शकला नाही. येथे मात्र वेगवेगळ्या नेत्यांचेच ब्रॅंड निर्माण झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना जो फायदा व्हायला हवा होता तो झाला नाही अशी खंतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला. 

मुख्यमंत्री शेवटी म्हणाले, की कॉंग्रेस राजवटीतही शेतकऱ्यांना सरसकट माफी मिळाली नव्हती. आमचे सरकारही सरसकट कर्जमाफी देऊ शकत नाही. जे नियमित कर्ज भरतात त्यांना कर्ज भरू नका अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण करू नका. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे शिवाय बॅंकाही अडचणीत येणार आहेत. 

दुष्काळीभाग श्रमदान करून जलयुक्त होत आहेत. कमी क्षेत्रात जास्त उत्पादन काही शेतकरी घेता आहेत. प्रयोग यशस्वी करता आहेत. कृषिक्षेत्राचा वेग वाढत आहेत. शेतकऱ्याला कृषिकर्ज सहज कसे उपलब्ध होईल याची दक्षता सरकार घेत आहे. 
यावर्षी राज्यात 20 लाख टन तूरीचे उत्पादन झाले त्यापैकी सहा लाख टन खरेदी केली. कॉंग्रेस राजवटीत 14 लाख टन तूरीचे उत्पादन झाले होते. तेंव्हाच्या सरकारने वीस हजार टन खरेदी केली होती. याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. 
....................... 


 


 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com