`हर्षवर्धन जाधवांविरोधात दाखल केलेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा धादांत खोटा'

मनसेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा धादांत खोटा असून, राजकीय हस्तक्षेपामुळेच तो दाखल करण्यात आला आहे, असे मनसेचे मराठावाडा संपर्कप्रमुख जावेद शेख यांनी `सरकारनामा'शी बोलताना दिली.
false atrocity case registered against harshvardhan jadhav says mns
false atrocity case registered against harshvardhan jadhav says mns

औरंगाबादः मनसेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा धादांत खोटा असून, राजकीय हस्तक्षेपामुळेच तो दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या संदर्भात आमचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली असल्याची माहिती मनसेचे मराठावाडा संपर्कप्रमुख जावेद शेख यांनी `सरकारनामा'शी बोलताना दिली.

हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात क्रांतीचौक पोलीस स्टेशनमध्ये नितीन रतन दाभाडे या तरूणाने जातिवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली होती. त्यांनतर पोलीसांनी जाधव यांच्या विरुध्द अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. 

यावर मनसेमध्ये मला मोठे पद मिळाले, महापालिका निवडणुकीत मी अडचणीचा ठरेल म्हणून शिवसेनेनेच तक्रार व गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला होता.

जाधव यांच्यावर दाखल झालेल्या अॅट्रॉसिटीच्या प्रकरणाची दखल मनसेच्या मुंबईतील वरिष्ठ नेत्यांनी देखील घेतली. मराठवाडा संपर्कप्रमुख जावेद शेख पक्षाची भूमिका स्पष्ट करतांना म्हणाले, आम्ही या संपुर्ण घटनेची माहिती घेतली आहे, प्रथमदर्शनी जाधव यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा हा धांदात खोटा असल्याचे आमचे मत झाले आहे. 

हर्षवर्धन जाधव यांनी याबाबत त्यांना जे वाटले ते प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. मनसेचा मराठवाडा संपर्कप्रमुख म्हणून मला जी माहिती मिळाली आहे, त्यानूसार या प्रकरणात नक्कीच राजकीय हस्तक्षेप झालेला आहे आणि त्यातूनच जाधव यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमचे दुसरे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी स्वःत पोलिस आयुक्त डॉ. चिरंजवी प्रसाद यांची भेट घेऊन सत्य परिस्थिती सांगितली आहे. तसेच या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे जावेद शेख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com