`वंचितला अपयश आल्याने आंबेडकरी चळवळीत निराशा`

anandraj ambedkar about vanchit
anandraj ambedkar about vanchit

औरंगाबाद : "आमचा सीएए, एनआरसीला कडाडून विरोध आहे. रामजन्मभूमीचा मुद्दा संपल्याने भाजकडून सीएए, एनआरसीचा मुद्दा आणला जात आहे. भाजपकडून सध्या धर्मा-धर्मावरून भेदाचे राजकारण केले जात आहे,'' अशी टीका रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केली. मंगळवारी (ता. 14) पक्षाची नवीन राज्यकार्यकारिणी गठित करण्यात आली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आंबेडकर म्हणाले, ""रामजन्मभूमीचा मुद्दा संपल्याने भाजपकडून सीएए, एनआरसी पुढे केली जात आहे; मात्र आम्ही अन्न, वस्त्र, निवारा याकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहोत. यांना कोणते रजिस्टर आणायचे असेल तर त्यांनी बेरोजगारांचे रजिस्टर आणावे. यातून किती बेरोजगार आहे, त्यांची वेगळी माहिती मिळेल; मात्र हे सर्व सोडून केंद्राकडून भेदाभेदाचे राजकारण सुरू आहे. सीएए आणण्याची काय गरज होती का? पाकिस्तान, बांग्लादेशातून आलेल्या 34 हजार लोकांना अगोदरच नागरिकत्व देण्यात आले आहे; मात्र एका धर्माला वगळून त्यांना इतरांना मेसेज पाठवायचा आहे. यातून राजकीय उद्देश साध्य करणे अतिशय दुर्दैवी आहे. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन समता, बंधुत्व, संविधानावर चालले पाहिजे,'' असे आवाहनही त्यांनी केली.

रिपब्लिकन सेनेची "वंचित'पासून फारकत
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला अपयश आल्यानंतर रिपब्लिकन सेनेने आता आपली वेगळी वाट निवडली आहे. वंचितला अपयश आल्याने आंबेडकरी चळवळीत निराशा आहे. त्यामुळे आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्यासाठी रिपब्लिन सेनेची नवीन राज्यकार्यकारिणी जाहीर केली. आम्ही स्वतंत्रपणे आमच्या पायावर उभे राहत आहोत. कुणासोबत जायचे का, याचा त्यावेळची परिस्थिती बघून विचार केला जाईल असे आनंदराज आंबेडकर म्हणाले.

नामविस्ताराची लढाई त्यागावर
नामविस्तार दिनाला 25 वर्षे होत आहेत. ज्यांना यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, सर्व त्यागून लढ्यात आयुष्याची राख-रांगोळी केली, ज्यांनी आंबेडकरी चळवळीसाठी त्याग केला त्यांचे मनापासून धन्यवाद. ही लढाई त्यागावर उभी राहिली. जेथे अन्याय होतो तेथे लोकांच्या हातात बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या प्रतीचे छायाचित्र असते. जेएनयू, जामियामध्ये आपण हे बघितले. इतकेच नव्हे तर विरोधकांच्या हातातसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आहेत, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com